आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रग्ज प्रकरण:2019 मध्ये घरी झालेल्या पार्टी व्हिडिओबाबत दिग्दर्शक करण जोहरकडे एनसीबीने मागितली माहिती

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपट क्षेत्राशी संबंधित ड्रग्जप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) चित्रपट निर्माते करण जोहर यांना नोटीस बजावली आहे. करण जोहर यांच्या घरी गेल्या वर्षी झालेल्या पार्टीच्या व्हायरल व्हिडिओबाबत शुक्रवारपर्यंत माहिती देण्याचे नोटिसीत सांगितले आहे.

करण जोहर यांना स्वत: उपस्थित राहण्याची गरज नसून ते त्यांचा प्रतिनिधी पाठवू शकतात, असे एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. २८ जुलै २०१९ रोजी त्यांच्या घरी झालेल्या पार्टीचे चित्रीकरण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या गॅजेट्सची माहिती देण्याचे जोहर यांना सांगण्यात आले आहे. तसेच कोण काेण या पार्टीत सहभागी झाले होतेे. एखादी निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली होती का, याचीही माहिती द्यावी लागणार आहे. बॉलीवूडचे ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर करण जोहर यांच्या घरी आयोजित एका पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात मलायका अरोरा, झोया अख्तर, अर्जुन कपूर, अयान मुखर्जी, दीपिका पदुकोण, कार्तिक आर्यन यासारखे कलाकार होते.

एकता कपूरला दिलासा; वेबसिरीज प्रकरणात अटकेला कोर्टाची स्थगिती
मालिका निर्माता एकता कपूरला सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. वेबसिरीज “ट्रिपल एक्स सीझन-२’ मध्ये कथित आक्षेपार्ह दृश्यांवरून दाखल गुन्ह्यात एकता कपूरच्या अटकेला कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे. या वेबसिरीजच्या माध्यमातून अश्लीलता फैलावणे, लष्करी वर्दीचा अपमान व धार्मिक भावना दुखावण्याच्या आरोपात तिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...