आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखच्या 'मन्नत'ला मिळाला नवा लूक:दरवाजावर नवीन एलईडी डायमंड नेमप्लेट, मुख्य गेटचा रंगही बदलला

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

किंग खानचे घर 'मन्नत' कायम चर्चेत असते. अलीकडेच पुन्हा एकदा मन्नतचा नवा लूक चर्चेत आला आहे. याचे कारण म्हणजे मन्नतवर नवीन नेमप्लेट बसवण्यात आली आहे. अलीकडेच शाहरुख खानच्या फॅन क्लबने मन्नतच्या मेन गेटचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्याच्या घराची आलिशान नेमप्लेट दिसत आहे. आता शाहरुखचे चाहते त्याच्या घराच्या नवीन नेमप्लेटसमोर फोटो काढत आहेत. बातमीनुसार, नवीन नेमप्लेटची खासियत म्हणजे त्यात डायमंड आणि एलईडी लाइट लावण्यात आले आहेत. नेमप्लेटशिवाय मन्नतच्या मुख्य गेटमध्येही बदल करण्यात आले आहेत. फोटो समोर आल्यापासून लोक शाहरुखच्या लक्झरी लाइफबद्दल चर्चा करत आहेत.

शाहरुखच्या घरावर लागली आलिशान नेमप्लेट

सोशल मीडियावर समोर आलेल्या फोटोतून मन्नतवर नवीन नेमप्लेट लावण्यात आल्याचे समजते. एवढेच नाही तर नेमप्लेटसोबतच मन्नतचे मुख्य गेटही बदलण्यात आले आहे. फोटोंमध्ये मन्नतचे गेट ब्लॅक अँड व्हाइट रंगात दिसत आहे. फोटोंमध्ये, मन्नत आणि लँड्स एंडच्या दोन्ही नेमप्लेट्स चमकताना दिसत आहेत.

नेमप्लेट हटवल्यामुळे शाहरुखचे चाहते झाले होते नाराज

याआधीही एप्रिलमध्ये मन्नतची नेम प्लेट बदलण्यात आली होती. मात्र, काही दिवसांनी गेटवर नेम प्लेट नसल्याचे चाहत्यांच्या लक्षात आले होते, त्यामुळे किंग खानचे चाहते चांगलेच नाराज झाले होते. नेमप्लेट चोरीला गेल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, नंतर दुरुस्तीसाठी नेमप्लेट काढण्यात आल्याची माहिती समोर आली होती.

शाहरुखसाठी मन्नतचे वेगळे महत्त्व
हे घर शाहरुख खानने 2001 मध्ये 13.32 कोटी रुपयांना खरेदी केले होते. आज या घराची किंमत जवळपास 350 कोटी इतकी आहे. पूर्वी शाहरुखला या बंगल्याचे नाव 'जन्नत' ठेवायचे होते, पण नंतर तो त्याचा स्वप्नातील बंगला असल्याने त्याने त्याचे नाव 'मन्नत' ठेवले.

शाहरुखसाठी 2023 आहे खूप खास
2023 मध्ये किंग खान त्याच्या 3 बहुप्रतिक्षित चित्रपटांसह सज्ज आहे. पुढच्या वर्षी किंग खान 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' या चित्रपटात दिसणार आहे. 'पठाण' हा चित्रपट 25 जानेवारीला, 'जवान' जूनमध्ये आणि राजकुमार हिराणींचा 'डंकी' डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. पठाण चित्रपटात शाहरुख मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याआधी शाहरुखने 'ब्रह्मास्त्र' आणि 'रॉकेट्री'सारख्या चित्रपटात कॅमिओ केले आहेत. 'झिरो' हा त्याचा शेवटचा चित्रपट होता, जो बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. अशा परिस्थितीत शाहरुखला त्याच्या तिन्ही चित्रपटांकडून खूप अपेक्षा आहेत.

बातम्या आणखी आहेत...