आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन:करणच्या घरी झालेल्या पार्टीत हजर होते दीपिका, रणबीर, मलायका आणि अर्जुन कपूर, विकी कौशल म्हणाला - चिल करायला गेलो होतो

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मागील वर्षी 28 जुलै रोजी निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या घरी झालेल्या हाऊस पार्टीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सुशांत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर एनसीबीचा तपास सुरू आहे. ही चौकशी बर्‍याच ए-लिस्टर स्टार्सपर्यंत पोहोचली आहे. यातले सर्वात मोठे नाव म्हणजे दीपिका पदुकोण. दीपिकावर अमली पदार्थांचे सेवन केल्याचा आरोप केला जातोय आणि याचा पुरावा म्हणून एक जुने चॅट समोर आले आहे. यामध्ये ती क्वान कंपनीचे मॅनेजर करिश्मा प्रकाश हिच्याकडे ड्रग्जची मागणी करत आहे. चौकशीनंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो दीपिकाला चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, मागील वर्षी 28 जुलै रोजी निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या घरी झालेल्या हाऊस पार्टीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. बॉलिवूडचे तरुण सेलेब्स या पार्टीत एकत्र जमले होते. सेलिब्रिटींवर या पार्टीत ड्रग्ज वापरल्याचा आरोप आहे.

  • या पार्टीत कोण-कोण होते?

करणच्या घरी झालेल्या या पार्टीमध्ये दीपिका पदुकोण, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, शाहिद कपूर, वरुण धवन, जोया अख्तर, विकी कौशल, अयान मुखर्जी आणि रणबीर कपूर उपस्थित होते. हा व्हिडिओ स्वतः करण जोहरने शूट केला होता आणि सोशल मीडियावर अपलोड केला होता. त्यावेळी या पार्टीत अमली पदार्थांचे सेवन केल्याचा आरोप या सेलिब्रिटींवर करण्यात आला होता.

  • विकी कौशल आणि करण जोहर यांनी दिले होते स्पष्टीकरण

जेव्हा विकी कौशलला पार्टीतील ड्रग्जच्या सेवनाबद्दल विचारणा करण्यात आली तेव्हा त्याने या पार्टीमागची कहाणी सांगितली. त्याने सांगितले होते की, 28 जुलै रोजी करणचा आम्हाला फोन आला आणि त्याने घरी या पार्टी करु असे म्हटले. म्हणून आम्ही तिथे गेलो. पण माझी प्रकृती फारशी ठीक नव्हती. कारण मी तीन दिवसांपूर्वीच डेंग्यूपासून बरा झालो होतो. तर करणने म्हटले होते की, पार्टीमध्ये उपस्थित सर्व सेलेब्स आठवडाभराच्या कामानंतर एन्जॉय करत होते. जर ड्रग्जसारखे काही असते तर मी स्वत: व्हिडिओ शूट करुन अपलोड का केला असता. तिथे प्रत्येकजण चांगले संगीत ऐकत होता आणि जेवणाचा आस्वाद घेत होता.

  • फॉरेन्सिक टीम व्हिडिओची चौकशी करणार

आता बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर एक वर्षानंतर या व्हिडिओची चौकशी सुरू झाली आहे. फॉरेन्सिक टीम या व्हिडिओचा शोध घेत आहे आणि काही दिवसांत त्याचा अहवाल सादर करेल. त्याचबरोबर, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो देखील या अहवालाची वाट पाहत आहे. जेणेकरून ते ड्रग्ज घेणार्‍या बॉलिवूडच्या ए-लिस्टर्सवर आपली पकड घट्ट करू शकेल.