आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनेरी आठवणी:अनेक वर्षांपासून शोधत असलेला फोटो हेमा मालिनी यांना आता सापडला, बॉलिवूड डेब्यूपुर्वी वयाच्या 14 व्या वर्षी केले होते फोटोशूट

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हेमा यांना जवळपास 55 वर्षे जुना फोटो आपल्या बायोग्राफीमध्ये जोडायचा होता, पण त्यावेळी त्यांना हा सापडला नव्हता.

ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 1968 मध्ये राज कपूरसोबत 'सपनों का सौदागर' मधून केली होती. मात्र त्यापुर्वी त्यांनी एका तामिळ मॅग्झीनसाठी खास फोटोशूट केले होते. हेमा यांना जवळपास 55 वर्षे जुना फोटो आपल्या बायोग्राफीमध्ये जोडायचा होता, पण त्यावेळी त्यांना हा सापडला नव्हता. शनिवारी त्यांना हा फोटो सापडल्यानंतर त्या सोशल मीडियावर शेअर करण्यापासून स्वतःला रोखू शकल्या नाहीत.

बायोग्राफीमध्ये जोडायची होती इच्छा
हेमा यांनी लिहिले - मी अनेक वर्षांपासून माझा हा खास फोटो शोधत होते. एका तामिळ मॅग्झीनसाठी खास एक फोटोशूट केले होते. मला नाव लक्षात नाहीत पण मला हे लक्षात आहे की, एव्हीएम स्टूडियामध्ये याची शूटिंग झाली होती. राज कपूर साहेबांसोबत 'सपनों का सौदागर'मध्ये डेब्यू करण्यापूर्वी हे फोटो शूट झाले. त्यावेळी माझे वय 14 किंवा 15 वर्षे होते. मला हे माझी बायोग्राफी 'बियॉन्ड द ड्रीमगर्ल' मध्ये जोडायचे होते. जेव्हा रायटर राम कमल मुखर्जी ते लिहित होते. मात्र तेव्हा मी हा फोटो शोधू शकले नव्हते. अखेर मला हा फोटो मिळाला आहे यामुळे खूप आनंदी आणि आता मी हा फोटो तुमच्यासोबत शेअर करत आहे.

हेमा मालिनी यांचा चित्रपटातील प्रवास
मथुरामधून खासदार हेमा मालिनी 72 वर्षांच्या झाल्या आहेत. गेल्या 4 दशकांदरम्यान त्यांनी 150 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी 1961 मध्ये सर्वात पहिले वनवासममध्ये छोटी भूमिका साकारली होती. जानेवारी 2020 मध्ये त्यांचा वर्षांपासून रिलीजसाठी अटकलेला शिमला मिर्ची चित्रपट रिलीज झाला आहे. यामध्ये त्यांच्यासोबत राजकुमार राव आणि रकुल प्रीत सिंहही होते.

बातम्या आणखी आहेत...