आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिटेल इनसाइड:'गणपत'चे लंडनमध्ये उरलेले 10 दिवसांचे शूटिंग बँकॉकमध्ये पूर्ण करतील निर्माते; फायटरच्या भूमिकेत टायगर, तर बाइक स्टंट करताना दिसणार कृती

अमित कर्णएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्टुडिओमध्ये उभारला धारावीचा सेट

टायगर श्रॉफ आतापर्यंत लंडनमध्ये ‘गणपत’ चित्रपटाचे शूटिंग करत होता, मात्र तेथे अचानक ओमायक्रॉनचे प्रकरण वाढले. त्यामुळे संपूर्ण टीम शेवटच्या 10 दिवसांचे शूटिंग सोडून घरी परतली आहे. चित्रपटाची कास्ट अँड क्रू 7 जानेवारीला येणार होते, मात्र ते सर्वच नाताळानंतरच मंुंबईला परत आले. आता त्या उरलेल्या दहा दिवसांच्या शूटिंगची व्यवस्था ते बँकॉकमध्ये करणार आहेत. 'गणपत’मध्ये एका फायटरची कथा आहे. टायगर यात एका फायटरच्या भूमिकेत आहे.

स्टुडिओमध्ये उभारला धारावीचा सेट

सध्या चित्रपटाची पूर्ण कलाकार आणि क्रू भारतात परतले आहेत. आता निर्माते उरलेल्या 10 दिवसांच्या शूटिंगची समस्या सोडवण्यास लागले आहेत. बँकॉकचे लोकेशन ठरवण्यात आले आहे. तेथे रेकीसाठी टीम पाठवण्यात येणार आहे. बँकॉकच्या व्यतिरिक्त दिग्दर्शक विकास बहल अझरबेजानमध्येही शूट करायला जाणार आहेत. निर्माते मुंबईच्या धारावीच्या वस्तीत शूटिंग करण्याचा विचार करत होते, मात्र सद्य:स्थिती पाहून स्टुडिओमध्येच वस्ती उभारली जात आहे.

अजितच्या ‘वालीमाई’सारखे बाइक स्टंट सिक्वेन्सही असतील चित्रपटात
या चित्रपटात बाइकचे काही सिक्वेन्सही पाहायला मिळणार आहेत. टायगरसोबत कृती सेननही स्टंट करणार आहे. निर्मात्यांनी आधीच लंडनमध्ये बाइक चेस सिक्वेन्स शूट केले आहेत. हे सिक्वेन्स काहीसे साऊथचा स्टार अजितच्या ‘वालीमाई’ या चित्रपटाच्या ट्रेलरसारखेच आहेत. कृतीचे पात्र खरे तर टायगरसारखे लढवय्ये आहे. दोघेही एकाच झोपडपट्टीतील दाखवण्यात आले आहेत.

हृतिकनंतर आता अक्षयसोबत टक्कर घेणार टायगर
दुसरीकडे, टायगरचा पुढचा चित्रपट अक्षय कुमारसोबत ‘बडे मियाँ, छोटे मियाँ’ असल्याची बातमी आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाची औपचारिक घोषणा निर्माते करणार आहेत. ‘बडे मियाँ, छोटे मियाँ’मध्ये अक्षय आणि टायगरमधील टक्कर काहीशी ‘वॉर’मध्ये दाखवण्यात आलेल्या टायगर आणि हृतिक रोशनसारखी असेल.

बातम्या आणखी आहेत...