आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांतचे चाहते भावूक:फेसबुकवर बदलला सुशांत सिंह राजपूत अकाउंटचा प्रोफाइल फोटो, चाहते म्हणाले -  ‘सुशांत पुन्हा परतल्यासारखा वाटतोय'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या फोटोत तो एका समुद्राच्या किनाऱ्यावर पोझ देताना दिसत आहे.

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या फेसबुक प्रोफाइलमध्ये झालेला बदल बघून त्याचे चाहते हैराण झाले आहेत. सुशांतच्या निधनाला वर्षभरापेक्षा अधिकचा काळ उलटला असताना अचानक काही दिवसांपूर्वीच त्याच्या अकाउंटचा प्रोफाइल फोटो बदलला गेला आहे. सुशांतच्या अकाउंटवरील हा बदल त्याच्या चाहत्यांच्या लगेचच लक्षात आला आणि त्यांनी आता यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काही लोक सुशांतचा फोटो पाहून भावूक झाले आहेच तर काहींना मात्र सुशांतचा अशाप्रकारे फोटो बदलला जाणे आवडलेले नाही आणि काहींनी तर सुशांतच्या प्रोफाइलसोबत छेडछाड झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.

सुशांतच्या फोटोवर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने लिहिले, 'जो कोणी हे पेज हँडल करत आहे. त्याने कृपया कोणत्याही गोष्टी अपडेट करू नये. हे खूप विचित्र आहे. आम्हाला फक्त त्याच्या आठवणींसोबत जगायचं आहे. हे खुप वाईट आहे की कोणतरी तिसरीच व्यक्ती इथे येऊन त्याच्या पेजवर काही बदल करते. कृपया असे करू नका.' दुसऱ्या एका नेटक-याने लिहिले, 'हे सर्व काय आहे आणि सुशांतचे अकाउंट नक्की कोण पाहत आहे.' एका चाहत्याने भावूक होत म्हटले की, ‘सुशांत पुन्हा परतल्यासारखे वाटू लागले आहे.’

फेसबुकवर नव्याने अपलोड करण्यात आलेल्या या फोटोमध्ये सुशांत ब्लू शर्ट आणि व्हाइट पँटमध्ये दिसत आहे. या फोटोत तो एका समुद्राच्या किनाऱ्यावर पोझ देताना दिसत आहे.

टीम मॅनेज करते अकाउंट
गेल्या वर्षी जूनमध्ये सुशांतचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्याची टीम त्याचे सोशल मीडिया अकाउंट मॅनेजर करत होते. त्याच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी, त्याच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट शेअर करण्यात आली, ज्यात लिहिले होते, "तुमच्यासारखे चाहते सुशांतचे खरे गॉडफादर होते.' त्यानंतर त्याच्या बायो बदलण्यात आला होता. त्यात लिहिले होते, 'सुशांत सिंह राजपूत (21 जानेवारी 1986-14 जून, 2020) एक भारतीय अभिनेता, डान्सर, आंत्रप्रेनर आणि...'

14 जून 2020 रोजी झाले निधन

सुशांत सिंह राजपूतचे 14 जून 2020 रोजी निधन झाले होते. त्याने मुंबईतील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याचा अखेरचा चित्रपट 'दिल बेचारा' त्याच्या निधनानंतर ओटीटीवर रिलीज झाला होता. ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. 'छिछोरे' हा चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला सुशांतचा अखेरचा चित्रपट होता.

बातम्या आणखी आहेत...