आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅजेडी किंगची ट्रॅजेडी:प्रेग्नेंसीमध्ये सायरा बानो यांचे वाढले होते ब्लड प्रेशर आणि त्यानंतर कधीही आईवडील होऊ शकले नाहीत सायरा-दिलीप कुमार, शाहरुखला मानायचे मुलगा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिलीप-शाहरुख यांची पहिली भेट दिल आशना है या चित्रपटाच्या मुहूर्तावेळी झाली होती. सायरा बानो यांच्या मते, शाहरुख आणि दिलीप कुमार यांच्यात ब-याच गोष्टी सारख्या आहेत.

कामिनी कौशल आणि मधुबाला यांच्यानंतर अभिनेत्री सायरा बानो दिलीप कुमार यांच्या आयुष्यात आल्या आणि ते आयुष्यभराचे जोडीदार बनले. मात्र ते कधीही आईवडील होऊ शकले नाहीत. दिलीप कुमार यांनी त्यांचे आत्मचरित्र 'द सबस्टंस अँड द शॅडो'मध्ये याबद्दल खुलासा केला होता. त्यांनी सायरा आणि ते आयुष्यभर आईवडील का होऊ शकले नाहीत, याचे कारण सांगितले होते.

हे होते कारण
आत्मचरित्रात दिलीप कुमार यांनी सांगितले होते की, "खरंतर 1972 मध्ये सायरा पहिल्यांदा प्रेग्नेंट झाल्या. हा मुलगा होता (हे आम्हाला नंतर समजले). 8 महिन्यांच्या प्रेग्नेंसीनंतर सायरा यांना ब्लड प्रेशरची समस्या झाली. या दरम्यान पुर्ण स्वरुपात तयार झालेल्या भ्रूणचा जीव वाचवण्यासाठी सर्जरी करणे शक्य झाले नाही आणि जीव गुदमरल्यामुळे त्याचा मृत्यू झाला." दिलीप कुमार यांच्यानुसार या घटनेनंतर सायरा कधीच प्रेग्नेंट होऊ शकल्या नाहीत.

शाहरुखला मानायचे मुलगा, सायरा म्हणाल्या होत्या - "जर आमचा मुलगा असता तर तो शाहरुखप्रमाणे दिसला असता
सायरा यांनी 2017 मध्ये एका मुलाखतीत त्यांच्या शाहरुखसोबतच्या पहिल्या भेटीविषयी सांगितले होते. त्यांच्यानुसार शाहरुखने पहिला चित्रपट 'दिल आशना है' साइन केला होता. तेव्हा त्यांची भेट झाली होती. सायरा यांनी सांगितले होते की, आम्ही चित्रपटाच्या मुहूर्तासाठी जात होतो. दिलीप साहेबांनी सेरेमोनियल क्लॅप दिले होते. मी नेहमी म्हणते की, आपला मुलगा असता तर तो हुबेहूब शाहरुखप्रमाणे दिसला असता. शाहरुख आणि दिलीप साहेबांचे केस एकसारखेच आहेत. याच कारणांमुळे मी जेव्हा शाहरुखला भेटते तेव्हा त्याच्या केसांमधून हात फिरवते."

बातम्या आणखी आहेत...