आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅपी बर्थडे द रॉक:फुटबॉलपटू होऊ शकला नाही, रेसलिंगमधून मिळायचे 40 डॉलर, आता आहे जगातील सर्वाधिक मानधन घेणा-या अभिनेत्यांपैकी एक

लेखिका : प्रियांका जोशी20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फोर्ब्सच्या यादीत चौथा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता

ड्वेन जॉन्सन म्हणजेच द रॉक आज त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. ड्वेन जॉन्सनचे हॉलिवूड चित्रपटांपासून ते रेसलिंगपर्यंत प्रत्येक ठिकाणी फॅन फॉलोअर्स आहेत. ड्वेनने आपल्या करिअरची सुरुवात फुटबॉलपटू म्हणून केली असल्याचे क्वचितच लोकांना ठाऊक असावे. हा फुटबॉलपटू नंतर रेसलर आणि एक उत्कृष्ट अभिनेता बनला. पण ड्वेनला मात्र अभिनेता किंवा रेसलर व्हायचे नव्हते. त्याची आवड फुटबॉल ही होती. चला जाणून घेऊया, ड्वेन द रॉक आणि त्यानंतर जगातील सर्वाधिक मानधन घेणा-या अभिनेत्यांपैकी एक कसा बनला -

14 वर्षांचा असताना आईवडिलांचा झाला घटस्फोट
2 मे 1972 रोजी कॅलिफोर्नियातील रेसलर रॉकी जॉन्सनच्या घरी ड्वेन जॉन्सनचा जन्म झाला. ड्वेनची आई देखील रेसलिंगच्या पार्श्वभूमीची होती. ड्वेन जॉन्सनचे आयुष्य चांगले चालले होते, त्याच दरम्यान त्याच्या आईला त्याच्या वडिलांच्या अवैध संबंधाची माहिती मिळाली, ज्यामुळे दोघांमध्ये भांडणे सुरू झाली. रॉकी त्या काळातील सर्वोत्तम रेसलरपैकी एक होते. पण याचदरम्यान 19 वर्षीय तरुणीने रॉकीवर बलात्काराचा आरोप केला आणि त्याला अटक करण्यात आली होती. यामुळे ड्वेनची आई एटा आणि वडील रॉकी यांचा घटस्फोट झाला. या घटस्फोटाचा आणि वडिलांवरील आरोपांचा रॉकीला चांगलाच परिणाम झाला. रॉकी त्याच्या आईसोबत फ्लॅटमध्ये राहू लागला, त्याकाळात त्याला हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागला.

फुटबॉलमधील कारकीर्द

ड्वेन शिकत असताना शाळेच्या फुटबॉल टीममध्ये खेळण्याची त्याला संधी मिळाली. ड्वेनची फुटबॉलकडे रुची वाढू लागली. ड्वेनला डिफेंसिव्ह टेकलसाठी संघात स्थान मिळू लागलो. तो एक चांगला फुटबॉलपटू होता, त्यामुळे त्याला मियामी विद्यापीठाची शिष्यवृत्तीही मिळाली. 1995 मध्ये ड्वेन जॉन्सनने जनरल स्टडीज इन क्रिमिनोलॉजी आणि फिजियोलॉजी या विषयात बॅचलर पदवी पूर्ण केली. तो त्याच्या कॉलेजमध्ये ड्रग्जबद्दल लोकांना जागरुकही करत असे. पदवीनंतर, ड्वेनची कॅल्गरी स्टॅम्पेडर्सद्वारे कॅनेडियन फुटबॉल लीगमध्ये निवड झाली होती, परंतु दुखापतीमुळे तो दोन महिन्यांसाठी सीझनमधून बाहेर पडला. यादरम्यान ड्वेन डिप्रेशनमध्ये गेला होता.

1996 मध्ये रेसलिंगमध्ये ठेवले पाऊल
आता ड्वेनचे फुटबॉलमध्ये मन रमत नव्हते. ड्वेनची त्याच्या वडिलांसारखी चांगली शरीरयष्टी होती, त्यामुळे त्याने आपल्या वडिलांप्रमाणेच रेसलिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. रेसलर पॅट पॅटरसनने 1996 मध्ये जॉन्सनला वर्ल्ड रेसलिंग फेडरेशन (WWF) सोबत अनेक चाचणी सामने मिळवून दिले. ड्वेनने 10 मार्च रोजी हाऊस शोमध्ये द ब्रुकलिन ब्रॉलरचा पराभव केला आणि ख्रिस कॅंडिडो आणि ओवेन हार्ट यांच्याकडून सामना गमावला. आता ड्वेन रेसलिंगसाठी तयार झाला होता. ड्वेनने युनायटेड स्टेट्स रेसलिंग असोसिएशनसोबत फ्लेक्स कवाना नावाने कुस्ती खेळण्यास सुरुवात केली, त्यानंतर 1996 च्या उन्हाळ्यात बार्ट सॉयरसोबत दोनदा USWA वर्ल्ड टॅग टीम चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर जॉन्सनने WWF करारावर स्वाक्षरी केली.

रॉकी मॅयविया नावाने WWF मध्ये सामील झाला

ड्वेनला आता WWF मध्ये पाऊल टाकायचे होते, म्हणून त्याने रॉकी मॅयविया हे नाव निवडले. हे त्याच्या वडिलांच्या आणि आजोबांच्या नावाचे कॉम्बिनेशन होते. विशेष म्हणजे त्याची प्रसिद्धी त्याच्या घराण्याची तिसरी पिढी म्हणून करण्यात आली. ज्याबद्दल ड्वेनलाही नंतर कळले. ड्वेनने एका सामन्यानंतर स्वतःचे नाव रॉक ठेवले, त्यानंतर तो 'द रॉक' म्हणून प्रसिद्ध झाला. ड्वेन जॉन्सन हा 2000 ते 2002 पर्यंत रेकॉर्ड ब्रेकिंग चॅम्पियन होता.

10 वेळा विश्वविजेता

ड्वेन जॉन्सन म्हणजेच द रॉकने 10 वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली आहे. तो दोन वेळा इंटरकॉन्टिनेंटल चॅम्पियन, पाच वेळा टॅग टीम चॅम्पियन, 2000 रॉयल रंबल विजेता आणि WWE चा सहावा ट्रिपल क्राउन चॅम्पियन देखील आहे.

दोन लग्नापासून तीन मुले

ऑगस्ट 2019 मध्ये, जॉन्सनने त्याची गर्लफ्रेंड आणि गायिका लॉरेन हाशियनशी लग्न केले. या लग्नापासून त्याला जास्मिन लिया आणि टियाना जिया या दोन मुली आहेत. जॉन्सनला त्याच्या पहिल्या लग्नापासून एक मुलगा असून त्याचे नाव सिमोन अलेक्झांड्रा आहे. ड्वेनने 1997 मध्ये त्याची कॉलेजमधील गर्लफ्रेंड डॅनी गार्सियाशी लग्न केले. पण लग्नाच्या 10 वर्षानंतर 2007 मध्ये दोघेही वेगळे झाले.

रेसलिंग शोमधून अभिनय कारकिर्दीला केली सुरुवात
ड्वेनने 1999 मध्ये 'द रेसलिंग शो'मध्ये वडिलांची भूमिका साकारून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. टीव्ही शो करत असताना त्याने 'स्टार ट्रेक: व्हॉयेजर' या अमेरिकन सायन्स फिक्शन टेलिव्हिजन मालिकेत काम केले. या मालिकेतील त्याचे सेव्हन ऑफ नाईन हे पात्र खूप गाजले. त्‍यामुळे त्‍याला 2001 मध्‍ये 'द ममी रिटर्न्‍स' हा पहिला चित्रपट मिळाला. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. त्यानंतर ड्वेनचे करिअर चित्रपटांमध्ये सुरू झाले. यानंतर 2003 मध्ये द रनडाउन, 2004 मध्ये वॉकिंग टेल, 2005 मध्ये बी कूलसह त्याचे अनेक चित्रपट आले.

2010 मध्ये यश

रॉकची फिल्मी कारकीर्द चांगली चालली होती, पण त्याला 2010 मध्ये आलेल्या फास्ट फाइव्ह या चित्रपटातून मोठे यश मिळाले. हा चित्रपट 2011 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा 7वा चित्रपट होता.

40 चित्रपटांमध्ये काम केले

2001 पासून हॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात करणाऱ्या ड्वेन जॉन्सनने आतापर्यंत 40 चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट आले. हा क्रम आजही चालू आहे. त्याला अभिनयासाठी आतापर्यंत 20 पुरस्कार मिळाले आहेत. 2016 आणि 2019 मध्ये, ड्वेनला टाइम्सने जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान दिले होते.

फोर्ब्सच्या यादीत चौथा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता
2022 मध्ये जाहीर झालेल्या फोर्ब्सच्या यादीत ड्वेन जॉन्सन हा जगातील चौथा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. त्याची लाइफस्टाइलही खूप वेगळी आहे. त्याची एकूण संपत्ती 1836 कोटी इतकी आहे. ड्वेनला महागड्या गाड्यांचा खूप शौक आहे, त्याच्या कार कलेक्शनमध्ये लॅम्बोर्गिनी, फेरारी सारख्या कारचा समावेश आहे. त्याचा फ्लोरिडामध्ये 37 कोटींचा एक व्हिला आहे, तर दुसऱ्या व्हिलाची किंमत 23 कोटी आहे. शिवाय कॅलिफोर्नियातील त्याच्या व्हिलाची किंमत 33 कोटी आहे. त्‍याच्‍याकडे 400 कोटींहून अधिक किमतीचे खाजगी जेट आहे. त्याला महागड्या घड्याळांची खूप आवड आहे ज्यासाठी तो खूप खर्च करतो. त्याचा 2021 मध्ये रेड नोटिस हा चित्रपट आला होता आणि 2022 मध्ये डीसी लॉज ऑफ सुपर पेट्स आणि ब्लॅक ऐडम हे चित्रपट येणार आहेत. ड्वेन सध्या आणखी 2 अनटाइटल्ड चित्रपटांमध्ये काम करत आहे.

बातम्या आणखी आहेत...