आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता मनोज बाजपेयीच्या ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजच्या दुसर्या सीझनची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, शोच्या निर्मात्यांनी या ख्रिसमसला चाहत्यांना सरप्राइज देण्याचा निर्णय घेतला आहे. मेकर्स सोशल मीडियाच्या माध्यमातून या सीरिजच्या दुसर्या सीझनची प्रीमियरची तारीख जाहीर करण्याची तयारी करत आहेत.
या मालिकेशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, "नियोजनानुसार या वर्षाच्या अखेरीस (2020) ही सीरिज लाँच केली जाणार होती. मात्र लॉकडाऊन निर्मात्यांना तारीख लांबणीवर टाकावी लागली. सीरिजचे एडिटिंग अॅडव्हान्स आहे. यात व्हीएफएक्स मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. मात्र लॉकडाऊनमुळे पोस्ट प्रॉडक्शनचे काम लांबणीवर पडले. त्यामुळे यावर्षी मालिकेचा दुसरा सीरिज लाँच होऊ शकला नाही, तथापि, आता हा प्रोजेक्ट पूर्ण तयार झाला आहे आणि निर्माते पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ते रिलीज करणार आहेत. ख्रिसमसच्या निमित्ताने निर्माते त्याची प्रीमियरची तारीख जाहीर करतील. ही चाहत्यांसाठी एक भेट असेल."
दुस-या सीझनमध्ये सामंथा अक्किनेनी झळकणार
सीरिजमध्ये मनोज बाजपेयीने श्रीकांत तिवारी नावाच्या गुप्तहेराची भूमिका वठवली आहे. त्याच्या कुटुंबालादेखील तो कोणते काम करतो, हे माहित नसते. कुटुंबातील लोक त्याला ऑफिसमध्ये काम करणारा एक कर्मचारी समजतात. मात्र आपल्या प्रोफेशनमुळे श्रीकांतचे आयुष्य नेहमीच धोक्यात असते. निर्माता-दिग्दर्शक राज निदिमोरू आणि कृष्णा डीके यांच्या या वेब सीरिजच्या दुसर्या सीझनमध्ये दक्षिण भारतीय लोकप्रिय अभिनेत्री सामंथा अक्किनेनी देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.