आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपकमिंग फिल्म:दोन रात्रीची कहाणी आहे 'मेरी ख्रिसमस', कतरिना कैफ आणि विजय सेतुपती स्टारर चित्रपटाचे शूटिंग डिसेंबरपर्यंत पुढे ढकलले

अमित कर्ण24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोविडच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका संपल्यानंतरच श्रीराम राघवन शूटिंग सुरू करण्याच्या मूडमध्ये आहेत.
  • निर्मात्यांना जास्तीत जास्त दृश्ये ही रात्रीच्या वेळेत शूट करायची आहेत. ती परवानगी दुसरे लॉकडाऊन उघडल्यानंतर लगेच देण्यात आली नाही.
  • एप्रिलमध्ये शूटिंग सुरू होणार होते, मात्र लॉकडाऊन लागले, त्यानंतर कतरिनाला कोविड झाला.

दुसरे लॉकडाऊन उठताच यावर्षी बहुतेक कलाकार त्यांच्या आधीच्या कमिटमेंट पूर्ण करत आहेत. अशा परिस्थितीत नवीन प्रोजेक्ट पुढे सरकत आहेत. कतरिना कैफ आणि साऊथ स्टार विजय सेतुपतीसारखे मोठे स्टार्सही त्यांच्या जुन्या कमिटमेंट पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. हे दोघेही श्रीराम राघवन यांच्या 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटात एकत्र येत आहेत. खरं तर यावर्षी एप्रिलमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरु होणार होते, पण दुसऱ्या लॉकडाऊनमुळे ठरलेल्या वेळेत चित्रीकरण सुरू होऊ शकले नाही. आता हा चित्रपट फ्लोअरवर यायला यावर्षीचा डिसेंबर महिना उजाडणार आहे. चित्रपटाचे निर्माते संजय रौत्रेय यांनी याला दुजोरा दिला आहे.

आमच्याकडे मोठे बजेट नाही
दैनिक भास्करशी बोलताना संजय म्हणाले, ‘'मेरी ख्रिसमस' या चित्रपटावर डिसेंबरपूर्वी काम सुरू होऊ शकणार नाही. ते हप्त्यांमध्ये शूट करायचे नाही. आम्हाला ते स्टार्ट टू फिनिश मोडच्या शेड्यूलमध्ये पूर्ण करायचे आहे. कारण आमच्याकडे वेगवेगळ्या महिन्यांत चित्रपटाचे चित्रीकरण करण्यासाठी मोठे बजेट नाही. कतरिना सध्या ‘टायगर 3’मध्ये व्यग्र आहे.

कोविडच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका संपल्यानंतर शूटिंग सुरू करू
संजय सांगतात, 'आम्ही सध्या कोविडच्या तिसऱ्या लाटेची परिस्थिती पाहत आहोत. जर तिसरी लाट पुढील काही महिन्यांत आली तर आम्हाला पुन्हा शूट थांबवावे लागेल, आम्ही यासाठी जास्त पैसे खर्च करण्याच्या परिस्थितीत नाही. नक्कीच सध्या बऱ्याच चित्रपटांचे चित्रीकरण होत आहे, परंतु दुसरे लॉकडाउन उठवल्यानंतर लगेच ती परिस्थिती नव्हती. कुठे आठवड्यात दोन दिवस शूटिंगला परवानगी नव्हती. तर अनेक शहरांमध्ये रात्रीच्या शूटिंगला परवानगी नव्हती. आमचा चित्रपट असा आहे की तेथे रात्रीचे बरेच शूट आहेत. त्यामुळे तो अडकला. कोविडच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका संपल्यानंतर आम्ही शूट सुरू करू.'

श्रीराम राघवन यांचे नाव प्रेम आणि अभिमानाने घेतले जाते
साऊथ स्टार विजय सेतुपती ईनिवास यांच्या 'मुंबईकर' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्याचे शूटिंग संपले आहे. मात्र हा चित्रपट अद्याप रिलीज झालेला नाही. श्रीराम राघवनसोबत काम करण्यासाठी तो खूप उत्साहित आहे. त्याच्या जवळच्या मित्रांनी सांगितले, विजय सेतुपती हा श्रीराम राघवन यांचा मोठा चाहता आहे. श्रीराम राघवन हे मूळचे तामिळ आहेत. पण ते पुणे आणि मुंबईत मोठे झाले आहेत. असे असले तरी, श्रीराम राघवन यांचे नाव तामिळ चित्रपटसृष्टीत प्रेमाने आणि अभिमानाने घेतले जाते.

चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहोत
चित्रपटाचा अतिरिक्त तपशील शेअर करताना संजय रौत्रेय म्हणतात, कतरिनाला गेल्या वर्षी 'मेरी ख्रिसमस' ची स्क्रिप्ट ऑफर करण्यात आली होती. त्यानंतर लॉकडाऊन आला आणि चित्रपटाचे पुढील काम पुढे ढकलण्यात आले. आम्ही देखील आमच्या बॅनरसह इतर प्रोजेक्टमध्ये व्यस्त झालो. 'मेरी ख्रिसमस' हे वर्किंग टायटल आहे. जसे आयुष्मानच्या 'अंधाधुन' या चित्रपटाचे शीर्षक सुरुवातीला 'शूट द पियानो प्लेअर' असे होते. शेवटपर्यंत आम्ही क्लॅप बोर्डवर चित्रपटाचे शीर्षक 'शूट द पियानो प्लेअर' हेच ठेवले होते. शेवटी चित्रपटाचे शीर्षक 'अंधाधुन' करण्यात आले. 'मेरी ख्रिसमस'चे शीर्षक पुढे बदलले जाऊ शकते. आम्ही सर्व या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहोत.

बातम्या आणखी आहेत...