आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेट इज ओव्हर:शाहरुखच्या वाढदिवशी रिलीज झाला 'पठाण'चा टिझर, शाहरुखवरुन हटणार नाही नजर!

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा आज 57 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने यशराज फिल्म्सने त्याच्या चाहत्यांना सरप्राइज दिले आहे. शाहरुखच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पठाण या चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या टिझरमध्ये शाहरुखचा अ‍ॅक्शन अवतार लक्ष वेधून घेतोय. त्याच्यासोबत जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण यांचीही झलक टिझरमध्ये बघायला मिळतेय. हा अ‍ॅक्शनपॅक्ड चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होतोय. झिरो या चित्रपटाच्या अपयशानंतर आता शाहरुखला पठाणकडून ब-याच अपेक्षा आहेत. टिझर बघता हा चित्रपट प्रेक्षकांची निराशा करणार नाही, असे तरी सध्या दिसतेय. हा चित्रपट सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला असून यातील सलमान खानच्या छोट्याशा भूमिकेचीही चांगलीच चर्चा होत आहे. पाहा 'पठाण'चा बहुप्रतिक्षित टिझर...

बातम्या आणखी आहेत...