आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांतचा शेवटचा चित्रपट:'दिल बेचारा'चा ट्रेलर आज होणार रिलीज, संजनाने दिला सुशांतच्या आठवणींना उजाळा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'दिल बेचारा' हा चित्रपट 24 जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
Advertisement
Advertisement

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट ठरलेल्या 'दिल बेचारा'चा ट्रेलर आज (6 जुलै) रिलीज होईल. या चित्रपटात त्याच्यासह  'रॉकस्टार' फेम संजना सांघी दिसणार आहे. संजना ही अशी व्यक्ती आहे जिने चित्रपटाच्या सेटवर  सुशांतसोबत सर्वाधिक वेळ घालवला. दैनिक भास्करसोबत झालेल्या खास बातचीतमध्ये संजनाने सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्याच्या आठवणी कायम मनाच्या कोप-यात जपून ठेवणार असल्याचेही सांगितले.

संजनाच्या म्हणण्यानुसार, आमच्या दोघांमध्ये बर्‍याच गोष्टीत साम्य होते. सेटवर पहिल्याच दिवशी आमच्यात खूप चांगली मैत्री झाली.  सुशांत कमी बोलायचा, पण तरीदेखील त्याच्यासोबत लगेच मैत्री झाल्याचे संजना सांगते. सुशांतप्रमाणेच संजनाही तिच्या कॉलेजची टॉपर राहिली आहे. सुशांतने फिजिक्स या विषयात टॉप केले होते,  तर संजना पॉलिटिकल सायन्स या विषयात टॉपर होती. सेटवर दोघेही पुस्तकांवर तासन्तास बोलत असत.

  • संजना म्हणाली - त्याने नेहमीच पुढे जाण्याची प्रेरणा दिली

सुशांतप्रमाणे संजनालाही पुस्तके वाचण्याची आवड आहे. संजना म्हणाली की सुशांतने तिला पुढे जाण्यासाठी नेहमीच प्रेरित केले आणि 'तू आयुष्यात खूप पुढे जाशील' असे म्हटले होते. संजना म्हणाली की, आम्ही दोघांनी 'द फॉल्ट इन अवर स्टार्स 'हा चित्रपट पाहिला होता आणि पुस्तकही वाचले होते. म्हणूनच आम्हाला आमचे पात्र पडद्यावर जिवंत करणे सोपे आणि रोमांचक होते.

  • सुशांतप्रमाणे मीदेखील खाण्याची शौकीन आहे

संजना सांगते की, सुशांतलासुद्धा तिच्यासारखीच खाण्याची खूप आवड होती. दुपारच्या जेवणाच्या वेळी संपूर्ण टेबल विविध पदार्थांनी भरलेला असायचा. परंतु आम्हाला जमिनीवर बसून जेवायला आवडायचे. संजनाने सांगितले की,  'जेवणाच्या वेळी मी किती खाऊ शकते, असं म्हणत सुशांत कायम माझी चेष्टा करत असे.'

  • सुशांतचे शिक्षण आणि सिनेमाबद्दलचे शब्द अनमोल आहेत

संजना म्हणाली की, एकदा जेवताना माझ्या वडिलांचा मला मेसेज आला की, मी पॉलिटिकल सायन्समध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. ही बातमी ऐकताच सुशांत आणि दिग्दर्शक मुकेश छाबरा यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. ती म्हणते, 'सुशांतचे शिक्षण आणि सिनेमासाठीचे शब्द माझ्यासाठी मौल्यवान आहेत.'  

  • 'दिल बेचारा' 24 जुलै रोजी स्ट्रीम होईल

'दिल बेचारा' हा चित्रपट येत्या 24 जुलैला डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. कास्टिंग डायरेक्टरहून दिग्दर्शक झालेले मुकेश छाबरा यांचा हा पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट  सब्सक्राइबर्स आणि नॉन-सब्सक्राइबर्ससाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल. याचा अर्थ असा की, यूजर्सना डिस्ने प्लस हॉटस्टार हे अॅप डाऊनलोड करायचे आहे आणि ते हा चित्रपट कोणत्याही शुल्काशिवाय बघू शकतील. 

Advertisement
0