आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रेलर रिलीज:नेटफ्लिक्सच्या 'मिसेस सीरियल किलर'च्या ट्रेलरमध्ये सस्पेन्सचा तडका, लक्ष वेधून घेणारा आहे जॅकलिनचा अंदाज  

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चित्रपटाचा प्रीमियर नेटफ्लिक्सवर 1 मे रोजी होणार आहे.

नेटफ्लिक्सच्या आगामी 'मिसेस सीरियल किलर' या चित्रपटाचा ट्रेलर प्रसिद्ध झाला आहे. समोर आलेल्या या ट्रेलरमध्ये जॅकलिन फर्नांडिसचा दमदार अभिनय आणि सस्पेन्स बघायला मिळतोय. शिरीष कुंदर दिग्दर्शित या चित्रपटाचा प्रीमियर नेटफ्लिक्सवर 1 मे रोजी होणार आहे.

जॅकलिन फर्नांडिसने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून 'मिसेस सीरियल किलर' चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. यासोबत तिने लिहिले, , 'मिसेस सीरियल किलर 1 मे रोजी नेटफ्लिक्सवर. हे किलर ठरणार आहे.'

या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस आणि मनोज बाजपेयी पती-पत्नीची भूमिका साकारत आहेत. जेव्हा मनोज बाजपेयीला सीरियल किलर असण्याच्या आरोपात अटक होते, तेव्हा त्याची पत्नी आपल्या पतीला निर्दोष  निर्दोष असल्याचे सिद्ध करण्यासाठी स्वतः किलर बनते आणि पोलिसांना पोलिसांना गोंधळात टाकते. जॅकलिनचा हा निराळा अंदाज बघण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे. 

चित्रपटाची निर्मिती फराह खानने केली आहे तर तिचे पती शिरीष कुंदर यांनी दिग्दर्शन केले आहे. अनेक ट्विस्ट आणि टर्न्सने भरलेल्या या चित्रपटाचा प्रीमियर नेटफ्लिक्सवर 1 मे रोजी होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...