आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आगामी चित्रपट...:एप्रिलमध्ये रिलीज होणार सलमान खान अभिनीत 'राधे'चे ट्रेलर

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान याचा “राधे योर मोस्ट वांटेड भाई’ सध्या चर्चेत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करुन याच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली होती. हा चित्रपट ईदच्या दिवशी १३ मे रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. आता चित्रपटाचे ट्रेलर पाहण्यासाठीदेखील सलमानच्या चाहत्यांना जास्त वाट पाहावी लागणार नाही.

माहितीनुसार, चित्रपटाचे ट्रेलर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रिलीज केले जाऊ शकते. ट्रेलर आधी मार्चमध्ये रिलीज केले जाणार हाेते. मात्र आता याला रिलीजच्या एका महिना आधी एप्रिलमध्ये लाँच केले जाऊ शकते. सूत्रानुसार..., ट्रेलरमध्ये सलमानची संवादफेकी आणि संदीप हुड्डा आणि दिशा पाटनीचा शैलीदेखील धमाकेदार दिसणार आहे.

"टायगर ३'ला संगीत देणार प्रीतम चक्रवर्ती
सलमान खान आणि कॅटरिना कैफच्या ‘टायगर-3’ चित्रपटावर जोरदार काम सुरू आहे. यशराज फिल्म प्रॉडक्शनच्या या चित्रपटात सलमान आणि कॅटरिना टायगर आणि झोयाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आता या चित्रपटावर झपाट्याने काम सुरू आहे. दिग्दर्शक प्रीतम चक्रवर्ती यांचेही यात नाव जोडले गेले आहे. पूर्वी प्रीतमने सलमानच्या “रेडी” आणि “बजरंगी भाईजान” सारख्या चित्रपटांना संगीत दिले होते. सलमान आणि कॅटरिनानेही या चित्रपटाच्या अनेक भागासाठी चित्रीकरण सुरू केले असून आदित्य चोप्रा हा चित्रपट मोठ्या प्रमाणात बनवत आहेत.

बातम्या आणखी आहेत...