आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता कार्तिक आर्यन आणि प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओत दोघेही गप्पा मारत धम्माल मस्ती करताना दिसत आहेत. सोबतच कार्तिकने करणच्या आगामी 'जुगजुग जियो' या चित्रपटातील 'द पंजाबन साँग'वर तालदेखील धरला.
खरं तर एकेकाळी कार्तिक आर्यन आणि करण जोहर यांच्यात खूप छान मैत्री होती. परंतु गेल्यावर्षी जेव्हा कार्तिकने करणच्या 'दोस्ताना 2' चित्रपटातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले, तेव्हा त्या दोघांमधील वाद जगजाहीर झाले. या दोघांमध्ये दुरावा आल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमध्ये करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने कार्तिकला त्यांच्या ब्लॅक लिस्टमध्ये टाकले असल्याचा उल्लेख होता. पण आता दोघांमधील मतभेद दूर झाले असून त्यांच्यात पुर्वीसारखीच मैत्री झाली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अलीकडेच एका कार्यक्रमामध्ये करण जोहर आणि कार्तिक आर्यन एकमेकांच्या शेजारी बसून हसत-खेळत गप्पा मारताना दिसत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. हे दोघं एकमेकांशी अतिशय खेळीमेळीने बोलताना, वागताना दिसत आहेत. त्यावरून या दोघांमधील दुरावा संपल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.