आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SRKच्या फोटोवरून नागपूर पोलिसांची अनोखी जनजागृती:'जवान'चा लूक शेअर करत म्हटले, जेव्हा तुम्ही हेल्मेटशिवाय गाडी चालवता तेव्हा...

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नागपूर पोलिसांनी शाहरुखच्या आगामी 'जवान' या चित्रपटातील एका दृश्याची मदत घेतली आहे.

हेल्मेट हे आपल्या डोक्याच्या संरक्षणासाठी खूप महत्त्वाचे आहे, म्हणून जेव्हा कधी बाईक चालवाल तेव्हा हेल्मेट नक्की घाला. हेल्मेटशिवाय बाईक चालवणे धोकादायक ठरू शकते. अशा सूचना वारंवार पोलिसांकडून दिल्या जातात. पण तरीदेखील दुचाकीस्वार हेल्मेट घालतातच असे नाही. त्यासाठी त्यांच्यावर दंडात्मक कारवाईदेखील केली जाते. पण कधीकधी पोलीस मार्मिक पद्धतीनेदेखील लोकांना हेल्मेट घालण्यासाठी प्रवृत्त करत असतात. आता नागपूर पोलिसांनीदेखील एक आयडियाची कल्पना शोधून काढली आहे. यासाठी त्यांनी चक्क शाहरुखच्या आगामी 'जवान' या चित्रपटातील एका दृश्याची मदत घेतली आहे.

'डंकी' आणि 'पठाण' या चित्रपटांसह जवान हा शाहरुखचा आगामी चित्रपट आहे. या चित्रपटाचा टिझर अलीकडेच निर्मात्यांनी प्रदर्शित केला आहे. या टिझरमध्ये शाहरुखचा वेगळाच अंदाज लोकांचे लक्ष वेधून घेतोय. यातील एका दृश्यात शाहरुख जखमी अवस्थेत दिसत असून त्याच्या चेह-यावर ब-याच पट्टया लावलेल्या दिसत आहेत. याचीच मदत घेत नागपूर पोलिसांनी एक ट्वीट केले आहे. हेल्मट न घालणा-यांना उद्देशून हे ट्वीट करण्यात आले आहे. पोलीस म्हणतात, 'जेव्हा तुम्ही हेल्मेटशिवाय गाडी चालवता..' म्हणजेच हेल्मट न घालता गाडी चालवली तर तुम्ही असेच जखमी होऊ शकता, असेच काही सांगण्याचा प्रयत्न पोलिसांनी लोकांना केला आहे.

या ट्वीटला लोक किती गांभीर्याने घेतील हे तर सांगता येत नाही, पण जनजागरुतीसाठी पोलिसांनी वापरलेली ही आयडिया लोकांना भलतीच आवडलेली दिसतेय.

बघा शाहरुखच्या 'जवान' या चित्रपटाच्या टीझरची झलक

जवानविषयी...

शाहरुखचा जवान हा चित्रपट 2 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडा भाषेत प्रदर्शित होणार आहे. शाहरुखचा हा पहिला पॅन इंडिया चित्रपट असणार असून एटली या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. शाहरुख खान शेवटचा ‘झिरो’ या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट आनंद एल राय यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिस अपयशी ठरला होता. आता शाहरुख लवकरच सिद्धार्थ आनंद यांच्या ‘पठाण’ आणि राजकुमार हिराणींच्या 'डंकी' या चित्रपटात दिसणार आहे. ‘पठाण’ या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम दिसणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...