आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर इंटरव्ह्यू:‘द व्हाइट टाइगर’मुळे जगभरात लोकप्रिय झाला आदर्श,  ‘बलराम हलवाई’च्या भूमिकेसाठी ओळख लपवून केले होते दुकानात काम

अमित कर्णएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एशियन वर्ल्ड फिल्म फेस्टिव्हलमध्ये आदर्शला रायझिंग अवॉर्डने गौरविण्यात आले आहे.

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘द व्हाइट टाइगर’ने अभिनेता आदर्श गौरवला जगभरात लोकप्रिय केले. तो असा पहिला भारतीय अभिनेता आहे, ज्याचे रिज अहमद सारख्या बड्या हस्तींसोबत अमेरिकेत ‘इंडियन स्पिरिट अवॉर्ड’साठी नामांकन झाले आहे. एशियन वर्ल्ड फिल्म फेस्टिव्हलमध्येही त्याला रायझिंग अवॉर्डने गौरविण्यात आले आहे. आपला आनंद व भविष्याच्या नियोजनाबद्दल त्याने ‘दिव्य मराठी’शी मारलेल्या गप्पा…

  • तू तुझ्या नावाचा गौरव वाढवला आहे. याचे श्रेय कुणाला द्याल?

आदर्श - माझा भाऊ, वडील यांना याचे श्रेय देईन. मला कुटुंबाने खूप पाठिंबा दिला. कमी वयात खूप स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे मला माझी जबाबदारीही लवकर समजली. वयाच्या 14 व्या वर्षी ऑडिशन दिली. चित्रपट क्षेत्रात दूरवर कोणी ओळखीचे नव्हते. 2007 मध्ये जमशेदपूरहून मुंबईला आलो. या शहरातही कोणी ओळखीचे नव्हते. तेव्हापासून आतापर्यंतचा प्रवास मजेशीर आहे.

  • तुझ्या कुटुंबाचे सिनेमाशी तसे काही नाते नव्हते, तर अभिनेता होण्याचे मनात कसे आले?

मुंबई आल्यानंतर माझा पहिला विचार हाच होता. 2008 मध्ये काळा घोडा फेस्टिव्हलमध्ये काम करत होतो. कुणीतरी पाहिले. त्याने विचारले अभिनय करणार का? तेव्हा माझे वय फक्त 13 किंवा 14 असेल. मी ही हळूच होकार दिला.

  • आतापर्यंत किती जणांनी नकार दिला?

एका अभिनेत्याच्या आयुष्यात नकार येणे सहज असते. तुम्ही खूप चांगले अभिनेता असाल, तरीही दिग्दर्शकाचा दृष्टिकोन काही वेगळा असू शकतो. आपण त्यांच्या दृष्टीने योग्य असू, तर तुम्हाला नकार मिळू शकतो. यासारख्या अजून 50 गोष्टी असतात. ज्यामुळे तुम्हाला तुमची भूमिका, काम मिळते.

  • बलराम हलवाईच्या भूमिकेसाठी किती अभिनेत्यांनी ऑडिशन दिली?

तो विचार केला असता, तर वेडाच झालो असतो. मी तर फक्त भूमिकेसाठी काय तयारी करायची आहे, यावर भर देतो. मात्र, ऑडिशनच्या पाच ते सहा फेऱ्या झाल्या होत्या.

  • कधी दिग्दर्शकाला विचारले, या भूमिकेसाठी माझी का निवड केली ते?

जास्त जिज्ञासा दाखवून मी आपल्याच पायावर कुऱ्हाड का मारेन. निवड झाली होती. मी माझ्या कामावर लक्ष दिले. जास्त काही विचार केला, ना विचारले.

  • शूटिंगच्या ब्रेकमध्ये प्रियांका चोप्रा आणि राजकुमार रावसोबत काय गप्पा व्हायच्या ?

आम्ही 90 च्या दशकाच्या संगीताबद्दल बोलायचो. आम्ही जेव्हा गावात शूटिंग करायचो तेव्हा आम्ही आणि आताचे आणि जुन्या जमान्यातील संगीत, चित्रपट, अल्बम, कॅसेट प्लेयर्सविषयी बोलायचो. प्रियांकासुद्धा चांगली गायिका आहे. तिला संगीतात रस आहे. आम्ही तिघे आणि दिग्दर्शकांचा सोशल मीडिया ग्रुप आहे. आम्ही तेथे एकमेकांना सर्व अपडेट द्यायचो. चित्रपट हिट झाल्यानंतरही आम्ही एकमेकांचे अभिनंदन करायचो.

  • बलराम हलवाईचे पात्र जीवंत करण्यासाठी तू छोट्या दुकानात काम केल्याचे ऐकले ?

हो, मी काय काम करतो हे त्यावेळी त्याला सांगितले नव्हते. त्यानंतर त्याला न सांगताच त्याचे काम सोडून आलो होतो. आता तो मला पाहिल तेव्हा त्याला कळेल. बऱ्याचवेळा मी असे का करत आहे, याची काय गरज आहे, हा विचारही यायचा. पहिल्या दिवशी मी झाडू मारला, भांडे घासले, सुरुवातीला खूप वाईट वाटले, नंतर विचार केला, 10 ते 15 दिवसांत हे काम करुन निघून जावे. मात्र अनेक लोक तर हे आयुष्यभर करतात. लोकांचे जीवन हेच करण्यात निघून जाते. हा विचार मनात येताच खूप वाईट वाटायचे. कारण मी लोकांचा विश्वास तोडत आहे, असे वाटायचे. दुकानावरचं नव्हे तर मी गावात गेलो तेव्हादेखील मी माझे नाव लपवूनच काम करत होतो.

बातम्या आणखी आहेत...