आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • The Writer Of The Film Revealed, Said Vikram Batra Dimple Knew Each Other For Four Years, But The Time They Spent Together Was Only 40 Days

शेरशाह:चित्रपटाच्या लेखकाचा खुलासा, सांगितले - विक्रम बत्रा -डिंपल एकमेकांना चार वर्षांपासून ओळखत होते, परंतु त्यांनी एकत्र घालवलेला वेळ फक्त 40 दिवसांचा होता

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विक्रम आणि डिंपल यांनी फक्त 40 दिवस एकत्र घालवले होते

पटकथा लेखक संदीप श्रीवास्तव यांनी एका मुलाखतीत 'शेरशाह' या चित्रपटाच्या रिव्ह्यूजवर बातचीत केली. चित्रपटातील कियाराची भूमिका खूपच लहान असल्याची टीका होतेय. इतकेच नाही तर तिची भूमिका केवळ विक्रम बत्रा यांच्या मैत्रिणीपर्यंत मर्यादित ठेवण्यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आला. पण आता संदीप यांनी सांगितले की, दोघांनी प्रत्यक्षात खूप कमी वेळ एकत्र घालवला होता. हा चित्रपट शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित आहे. कियारा अडवाणीने या चित्रपटात त्यांची मैत्रीण डिंपल चीमाची भूमिका साकारली होती. चित्रपटात कियाराची भूमिका लहान असली तरी खूप महत्त्वाची आहे.

विक्रम आणि डिंपल यांनी फक्त 40 दिवस एकत्र घालवले होते

संदीप म्हणाले, "जेव्हा मी माझे रिसर्च करत होतो, तेव्हा मी डिंपल यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितले की कॅप्टन बत्रा आणि त्या एकमेकांना चार वर्षांपासून ओळखत होते, पण त्यांनी एकत्र घालवलेला वेळ फक्त 40 दिवस होता. मला वाटतं की जेव्हा आम्ही त्या 40 दिवसांचा सार काढला, जो त्यांच्यासाठी खूप अर्थपूर्ण आहे. मी त्यांचा खूप आदर करतो. ज्या पद्धतीने कियाराने हे पात्र साकारले आहे. त्यातून डिंपल यांच्या भावनांचा एसेंस येतोय. जो लोकांना वास्तवाशी जोडतो आहे."

डिंपल या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्याचा एक अतिशय महत्वाचा भाग आहेत
संदीप पुढे म्हणाले, "म्हणून त्यात आणखी काही जोडण्याची गरज होती, असे मला असे वाटत नाही. ते पुरेसे होते. त्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्याचा एक अतिशय महत्वाचा भाग आहेत, तुम्ही डिंपल यांच्या नात्याशिवाय त्यांची कथा सांगू शकत नाही. मला वाटते की आम्ही जे केले ते योग्य आहे.अनेकांनी असे म्हटले आहे की हे त्यांचे वैयक्तिक जीवन आणि सैनिक जीवनाचे योग्य मिश्रण आहे.'

चित्रीकरणापूर्वी डिंपल यांना भेटली होती कियारा चित्रीकरणापूर्वी कियाराने डिंपल यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान डिंपल यांनी विक्रम यांच्याविषयीच्या अनेक गोष्टी कियारासोबत शेअर केल्या होत्या. दोघींची भेट चंदीगड येथे झाली होती. तेव्हा त्या दोघींनी जवळपास 3 ते 4 तास चर्चा केली होती. विक्रम बत्रा यांच्या निधनानंतर त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता.

बातम्या आणखी आहेत...