आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'थँक गॉड' आणि 'राम सेतू'वर भारी पडला 'कांतारा':अक्षय कुमार आणि अजय देवगणच्या चित्रपटांचे शो रद्द

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अक्षय कुमारचा राम सेतू आणि अजय देवगणचा थँक गॉड हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा व्यक्त केली गेली होती. मात्र दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांचा अपेक्षाभंग केला. चित्रपटांना मिळालेले अपयश पाहून अनेक ठिकाणी चित्रपटगृहांच्या मालकांनी दोन्ही चित्रपट हटवले असून त्या ठिकाणी ऋषभ शेट्टीच्या कांताराचे हिंदी शो लावले आहेत.

थिएटर मालकांनी कांताराच्या स्क्रीन वाढवल्या
बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, कांताराला मिळत असलेले यश पाहून थिएटर मालकांनी थँक गॉड आणि राम सेतूचे शो कमी केले आहेत. तर कांताराच्या स्क्रीन वाढवल्या आहेत. शिवाय कांतारा चित्रपटाचे तिकीट दरही कमी आहेत. राम सेतू’ पेक्षा 40 टक्क्यांनी तर ‘थँक गॉड’पेक्षा 30 टक्क्यांनी ‘कांतारा’च्या तिकिटाचं दर कमी आहे. सोमवारी या दोन्ही चित्रपटांचे शो रद्द झाले. हिंदी भाषेमध्ये ‘कांतारा’ पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी चित्रपटगृहामध्ये गर्दी करत आहेत.

या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने 40 कोटींची केली कमाई
कांताराच्या हिंदी व्हर्जनने 3 आठवड्यांत 40 कोटींची कमाई केली आहे. तर कांताराच्या कन्नड व्हर्जनने आतापर्यंत 200 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत KGF 1 आणि KGF 2 चा रेकॉर्ड मोडला आहे. केवळ 15 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 250 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

IMDb वर सर्वोत्तम रेटिंग मिळवणारा चित्रपट
IMDb वर सर्वोत्कृष्ट रेटिंग मिळवण्याच्या बाबतीत कांतारा अव्वल ठरला आहे. IMDb वर सर्वोत्कृष्ट रेटिंग मिळवणारा सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट बनून कांताराने विक्रम रचला आहे. यापूर्वी हा विक्रम KGF 2 च्या नावावर होता.

बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड बनवले
KGF-1ला मागे टाकून कांताराने अलीकडेच 251 कोटी कमावले आहेत. एवढी कमाई करणारा हा कन्नड इंडस्ट्रीतील दुसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. एका छोट्या बजेटच्या चित्रपटाने एवढे प्रचंड कलेक्शन करून सगळ्यांनाच चकित केले आहे. सुरुवातीला कांताराची कमाई खूपच कमी होती, पण हळूहळू वर्ड ऑफ माऊथने हा चित्रपट कमाईत पुढे गेला.

बातम्या आणखी आहेत...