आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थिएटर उघडण्याचा आनंद:8 महिन्यांनंतर सुरु होत आहेत थिएटर, अभिषेक म्हणाला- ‘ही आठवड्यातील सर्वात चांगली बातमी’; नेटक-यांनी ट्रोल करत म्हटले - ‘तरी पण तू बेरोजगार राहणार’

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘आठवड्यातील सर्वात चांगली बातमी’ असे अभिषेकने ट्विटमध्ये म्हटले आहे.

अनलॉक 4 चा टप्पा संपल्यानंतर केंद्र सरकारने अनलॉकच्या 5 व्या टप्प्याची घोषणा केली आहे. अनलॉकच्या पाचव्या टप्प्यात चित्रपटगृहे आणि शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. 15 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे आणि मल्टिप्लेक्स सुरू होणार आहेत. चित्रपटगृह सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने एकूण क्षमतेच्या 50 टक्केच प्रेक्षकांना प्रवेश देण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान चित्रपटगृहे सुरु होणार हे ऐकून बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने ट्विट करुन आपला आनंद व्यक्त केला आहे. ‘आठवड्यातील सर्वात चांगली बातमी’ असे अभिषेकने ट्विटमध्ये म्हटले असून आनंदी असल्याचे इमोजी वापरले आहेत.

या ट्विटवरुन ट्रोल झाला अभिषेक
या ट्विटमुळे मात्र अभिषेकला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. एका यूजरने ‘पण तरीसुद्धा तुला असे नाही वाटत का तू बेरोजगार राहणार आहेस?’ असे म्हणत ट्रोल केले. त्या यूजरला अभिषेकने उत्तर दिले आहे. त्याने उत्तर देत ‘ते तुमच्या हातात आहे. तुम्हाला आमचे काम आवडले नाही तर आम्हाला आमचे पुढचे काम मिळणार नाही. त्यामुळे आम्ही 100 टक्के देऊन काम करत असतो आणि चांगलेच होईल यासाठी प्रार्थना करतो,’ असे अभिषेकने म्हटले आहे.

13 मार्च नंतर चित्रपटगृहांत चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत
यावर्षी थिएटरमध्ये रिलीज झालेला शेवटचा चित्रपट इरफान खानचा 'अंग्रेजी मीडियम' हा होता. हा चित्रपट 13 मार्च रोजी रिलीज झाला होता. त्यानंतर ओटीटीवर सुमारे 35 चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. ऑक्टोबरमध्ये पाचहून अधिक चित्रपटांनी ओटीटीच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे. आता अनलॉक 5 ची गाइडलाइन आल्यानंतर किती निर्माते चित्रपटगृहांत चित्रपट आणतात आणि किती जण दोन्ही प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करतात, हे बघावे लागेल.

2020 ची भरपाई होणे सोपे नाही
2019 हे वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीचे सर्वोत्कृष्ट वर्ष होते. यावर्षी सुमारे 250 चित्रपट प्रदर्शित झाले आणि सर्वांनी जवळपास 5600 कोटींचा व्यवसाय केला होता. इतकेच नाही तर बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षा जास्त कमाई करणारे सर्वाधिक 19 चित्रपटही 2019 मध्ये आले होते. 2020 बद्दल बोलायचे म्हणजे यावर्षात बॉक्स ऑफिसचे कलेक्शन सुमारे 800 कोटींच्या आसपास आहे, जे मार्चच्या दुसर्‍या आठवड्यात आले होते.

यानंतर लॉकडाऊन जाहीर झाले. आता वर्षाचे फक्त तीन महिने शिल्लक आहेत आणि दोनच मोठे चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत बॉक्स ऑफिसचे मोठे नुकसान होणे निश्चित आहे.

बातम्या आणखी आहेत...