आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजीएफ 2:चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलल्याने चित्रपटगृहांना बसणार मोठा झटका, 'आरआरआर'नंतर दुसरा मोठा चित्रपट लांबणीवर

अमित कर्ण2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तरण आदर्श यांनी 'केजीएफ 2' पुढे ढकलण्यामागील कारण स्पष्ट केले

'बेलबॉटम' आणि 'चेहरे' हे दोन मोठे चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाल्याने थिएटर मालकांना मोठा दिलासा मिळाला, मात्र त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. त्याचे कारण म्हणजे 'केजीएफ 2' या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या नवीन तारखेची नुकतीच घोषणा करण्यात आली. त्यानुसार निर्माते हा चित्रपट यावर्षी नव्हे तर पुढील वर्षी 14 एप्रिलला प्रदर्शित करणार आहेत. खरं तर यापूर्वी हा चित्रपट यावर्षी 10 सप्टेंबरला प्रदर्शित होणार अशी चित्रपट वितरकांमध्ये चर्चा होती. परंतु हा चित्रपटाचे प्रदर्शन पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. आता सप्टेंबर महिन्यात 'फास्ट अँड फ्युरियस 9' हा हॉलिवूड चित्रपट आणि कंगना रनोटचा थलायवी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. ऑक्टोबरमधील दसऱ्याची तारीख देखील रिक्त राहण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे 'RRR' पुढच्या वर्षी ईदला रिलीज होणार आहे, तर अजय देवगणचा 'मैदान' अजून प्रदर्शनासाठी तयार नाही.

चित्रपटगृहांसाठी ही एक वाईट परिस्थिती ठरत आहे
ट्रेड तज्ज्ञांनी सांगितले, "'केजीएफ 2' पुढे सरकल्याचा परिणाम 'जर्सी', 'भूल भुलैया 2' या चित्रपटांवर होईल. निर्माते कदाचितच त्यांचे हे चित्रपट यावर्षी रिलीज करतील. चित्रपटगृहांसाठी ही वाईट परिस्थिती आहे. थिएटर मालकांकडे यावर्षी सप्टेंबरमध्ये दाखवण्यासाठी थलायवी व्यतिरिक्त कोणताही नवीन मोठा हिंदी चित्रपट नसेल, हॉलिवूडचा 'फास्ट अँड फ्यूरियस 9' हा चित्रपट 3 सप्टेंबरला प्रदर्शित होईल. तर थलायवी 10 सप्टेंबरला प्रदर्शित होणार असल्याचे समजते. केजीएफ 2 हा सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता, त्यामुळे इतर मोठ्या चित्रपटांचे निर्मातेदेखील त्यांचे चित्रपट रिलीज करणार होते, पण आता असे होताना दिसणार नाहीये."

तरण आदर्श यांनी 'केजीएफ 2' पुढे ढकलण्यामागील कारण स्पष्ट केले

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श 'केजीएफ 2' पुढे ढकलण्यामागील कारण स्पष्ट करताना म्हणाले, "एक म्हणजे चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शन काम पूर्ण झाले नाही. दुसरे म्हणजे, निर्मात्यांना त्यांच्या चित्रपटासाठी सगळीकडील थिएटर सुरु हवे आहेत. यंदा दिवाळी, ख्रिसमस, गांधी जयंतीला थिएटर पुर्ण क्षमतेने सुरु होतील अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाहीये. म्हणून त्यांनी पुढच्या वर्षीची 14 एप्रिलची तारीख निवडली. साधारणपणे दरवर्षी एप्रिल ते जून पर्यंत ट्रेडनुसार सुट्टीचा कालावधी असतो. त्यामुळे मोठे चित्रपट याकालावधीत चित्रपट आणण्याच्या तयारीत आहेत. या सप्टेंबरमध्ये कंगना रनोटचा थलायवी हा एकमेवर हिंदी चित्रपट थिएटरमध्ये दाखल होतोय."

कोविडमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले

तरण आदर्श यांच्या व्यतिरिक्त, दैनिक भास्करने 'केजीएफ 2' चा मुख्य मुख्य नायक यशच्या निकटवर्तीयांशी बातचित केली. त्यांनी सांगितले सांगितले, "निर्मात्यांनी रिलीजची तारीख का पुढे ढकलली, त्याचे उत्तर प्रत्येकाकडे आहे. हा असा एक चित्रपट आहे. जे फक्त सिनेमागृहांसाठी बनला आहे. तसेच, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचावा अशी निर्मात्यांची इच्छा आहे. सध्या, चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने उघडलेली नाहीत. कोविडची तिसरी लाट पुढे येणे अपेक्षित आहे. म्हणून चित्रपटगृहांमध्ये गर्दी जमण्याची शक्यता कमी आहे. परिणामी, चित्रपटाचा तब्बल 225 कोटींचा निर्मिती खर्च वसूल होणे कठीण होते. पुढच्या वर्षी 14 जानेवारीपर्यंत कोविडच्या संभाव्य लाट संपुष्टात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर लोक थिएटरकडे वळतील."

बातम्या आणखी आहेत...