आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर इंटरव्ह्यू:हत्येच्या आरोपापेक्षा दुसरी वाईट कोणतीही गोष्ट नाही, आता मला कोर्टाच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे : रमेश तौरानी

अमित कर्णएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रमेश तौरानी म्हणाले - ही एक दीर्घ आणि कठीण लढाई होती

टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे रमेश तौरानी यांनी स्वागत केले आहे. या हत्या प्रकरणातील दोषी अब्दुल रौफ उर्फ ​​दाऊद मर्चंटची याचिका मुंबई हायकोर्टाने गुरुवारी फेटाळून लावली. मुंबई सत्र न्यायालयाने आरोपी अब्दुल रौफची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. उच्च न्यायालयाने अन्य आरोपी निर्माता रमेश तौरानी यांच्या विरोधात राज्य सरकारने केलेले अपील नामंजूर केले आहे. त्यामुळे तौरानी यांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर रमेश तौरानी यांनी भास्करसोबत बातचीत केली.

रमेश तौरानी म्हणाले - ही एक दीर्घ आणि कठीण लढाई होती
रमेश तौरानी म्हणाले- 'माझ्यावर हत्येचा खोटा आरोप लावण्यात आला होता. यामुळे माझ्यापेक्षा माझ्या कुटुंबाला खूप त्रास सहन करावा लागला. हत्येच्या आरोपापेक्षा दुसरे काहीही वाईट असू शकत नाही. आता उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मला दिलासा मिळाला आहे. ही एक दीर्घ आणि कठीण लढाई होती. परंतु आम्ही सत्य आणि देशाच्या न्याय व्यवस्थेवरील आपला विश्वास गमावला नाही.'

ऑगस्ट 1997 मध्ये झाली होती गुलशन कुमार यांची हत्या
टी-सीरिजचे मालक गुलशन कुमार यांच्या हत्येमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. मुंबईत पोलिसांनी सांगितल्यानुसार, या हत्याकांडात अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम व्यतिरिक्त काही मोठा व्यावसायिकांचा हात होता. संगीतकार नदीम सैफी यांच्यासह रमेश तौरानी यांचेही नाव या प्रकरणात समोर आले होते. गुलशन कुमार यांना ठार करण्यासाठी या लोकांनी मारेक-यांना 25 लाख रुपये दिल्याचा आरोप करण्यात आला होता.

अंडरवर्ल्ड मागत होता पैसा
12 ऑगस्ट 1997 ला मुंबईतील अंधेरी भागातील जीतेश्वर महादेव मंदिरा बाहेर गुलशन यांची गोळ्या मारुन हत्या करण्यात आली होती. अबु सलेमने गुलशन कुमार यांना 10 कोटी द्यायला सांगितले होते. मात्र गुलशन कुमार यांनी यासाठी स्पष्ट नकार दिला होता. एवढ्या पैशांत वैष्णो देवीचा भंडारा करेल, असे त्यांनी अबु सलेमला म्हटले होते. यामुळे नाराज झालेल्या अबू सलेमने गुलशन कुमार यांना जीवे मारण्याची जबाबदारी दाऊद मर्चंट आणि विनोद जगताप नावाच्या दोन शार्प शूटरला दिला होती. 9 जानेवारी 2001 रोजी जगतापने कबुली दिली होती की, त्यानेच गुलशन कुमार यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.

गुलशन कुमार यांना मारण्यात आल्या होत्या 16 गोळ्या
गुलशन कुमार बॉडीगार्डशिवाय मंदिरात पूजेसाठी जात होते. दरम्यान, मंदिराच्या बाहेर तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर एकामागून एक 16 गोळ्या झाडल्या. जेव्हा त्यांच्या ड्रायव्हरने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा शूटर्सनी त्याच्यावरही गोळ्या झाडल्या होत्या. गुलशन कुमार यांना रुग्णालयात नेण्यात आले, पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाला होता.

बातम्या आणखी आहेत...