आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • There Will Be No Shooting Of 'Gangubai Kathiawadi', 'Radhey' And 'Maidan' Before Two Months, The Makers Will Wait And Keep In Mind The Safety

कोरोनाची भीती:'गंगूबाई काठियावाडी', 'राधे' आणि 'मैदान'चे सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत चित्रीकरण नाही, सुरक्षेच्या कारणास्तव मेकर्स करणार प्रतिक्षा 

मुंबई (अमित कर्ण)2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • मान्सूनमुळे त्रस्त आहेत निर्माते, मोठे कलावंत पाहत आहेत व्हॅक्सीनची वाट

महाराष्ट्र शासनाकडून चित्रपटाच्या चित्रीकरणाची परवानगी तर मिळाली आहे, परंतु चित्रपट निर्मात्यांच्या मते ते त्यांचे काम सप्टेंबर-ऑक्टोबरपासून सुरू करू शकतील. या मागे बरीच कारणे आहेत. याबाबत भास्करने चार मोठ्या चित्रपटांची माहिती मिळवली...

 • 'गंगूबाई काठियावाडी'

संजय लीला भन्साळीच्या या चित्रपटाशी संबंधित लोकांच्या मते सरकारने चित्रीकरणाची परवानगी दिली असली तरी निर्मांत्यांकडून कलावंत, दिग्दर्शक, कला दिग्दर्शक किंवा कोणत्याही विभागाच्या लोकांना बोलवणे आले नाही. टेक्निकल क्रू मेंबर्सदेखील अजूनही आपल्या घरीच आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण सप्टेंबरपूर्वी सुरू होणे अशक्य असल्याची माहिती आहे. पुढच्या शेड्यूलसाठी वाट पाहणेच योग्य राहील असे सर्वांना वाटते. कारण 15-20  दिवसांनंतर पाऊस सुरू होईल. त्यामुळे याचे चित्रीकरण पावसाळ्यानंतर करण्याचा विचार निर्माते करत आहेत.

 • ‘राधे : योर्स मोस्ट वॉन्टेड भाई’

सलमान खान अभिनित ‘राधे’चे चित्रीकरण जवळजवळ पूर्ण झाले आहे. आता या चित्रपटाचे एक-दोन साँग सीक्वेंसेज बाकी आहे. जे जास्तीत जास्त 4-5 दिवसांत चित्रीत होऊन जातील. परंतु, याबाबत अजून काहीही चर्चा नाही. ‘अद्याप याबाबत कोणतेही बोलणे झाले नाही. पुढच्या महिन्यापर्यंत परिस्थिती पाहू. नंतर विचार करू. माझ्या मते जेव्हापर्यंत लस मिळत नाही तोपर्यंत मोठे कलावंत चित्रीकरणासाठी जाणार नाहीत. कारण त्यांच्यावर बऱ्याच निर्मात्यांच्या अपेक्षा आहेत. ते पूर्ण सुरक्षिततेने चित्रीकरण करणार आहेत.’ असे सलमानचा मॅनेजर जॉर्डी पटेल याने सांगितले.

 • ‘मैदान’

अजय देवगन अभिनित ‘मैदान’चा सेट नुकताच तोडण्यात आला. याच मैदानावरील 30 टक्के चित्रीकरण बाकी आहे. निर्मात्यांना हा सेट पुन्हा उभारण्यासाठी आता वेळ लागेल. हे सर्व पावसाळ्यानंतरच शक्य होईल, अशी सूत्रांची माहिती आहे.

 • ‘थलाइवी’

जयललिता यांच्यावर ‘थलाइवी‘बायोपिक बनवणारे निर्माता शैलेश सिंह म्हणतात,‘सध्या आम्ही निर्माते गिल्ड आणि इतरांच्या गाइडलाइन्स समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रत्येकाची भीती जाण्यासाठी वेळ लागणार आहे. चित्रीकरण तर होईलच, परंतु वेळ लागेल. मोठ्या कलावंतांच्या चित्रीकरणाबाबत काहीच सांगू शकत नाही. परंतु, मला वाटत नाही की ते लस तयार होण्याची प्रतीक्षा करतील कारण यासाठी कमीतकमी 6 ते 8 महिने लागतील. ते बऱ्याच दिवसांपासून घरातच आहेत आणि पुन्हा काम करण्यासाठी उत्सुक आहेत. सध्या तरी आम्ही 50 लोकांसह चित्रीकरण कसे करावे, यावर चर्चा करत आहाेत. नियोजन सुरू आहे, परंतु सप्टेंबर-आक्टोबरपूर्वी चित्रीकरण सुरू होईल असे वाटत नाही.’

हे आहे तज्ञांचे मत

 • ‘सर्व वेट अँड वॉच मोडवर आहेत’ - रमेश तौरानी, प्रोड्यूसर

सध्या भीतीचे वातावरण आहे. टेलिव्हिजनवाले चित्रीकरण करण्यास खूप उत्सुक आहेत. परंतु, चित्रपट निर्माते यासाठी थोडा वेळ घेणार आहेत. सर्व  वेट अँड वॉच मोडवर आहेत. ऑगस्ट-सप्टेंबरपूर्वी कोणतेही चित्रीकरण सुरू होणार नाही. आणि कोणतेही मोठे कलावंत लस किंवा औषधाशिवाय बाहेर पडणार नाहीत हेही तेवढेच खरे  आहे. ’  

 • सुरक्षितता वाटल्यास सुरू करू - - प्रीतीश नंदी, डायरेक्टर

‘आमची पहिली प्राथमिकता म्हणजे सुरक्षा आहे. यासाठी आपल्याला थोडे थांबावे लागेल तरी चालेल. दुसरीकडे सर्वांनाच पैशांची गरज आहे. जसे सुरक्षितता वाटेल आम्ही त्वरीत काम सुरू करू. ’

प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष मनीष गोस्वामी म्हणाले, "परवानगी मिळून एकच दिवस झाला आहे. आता कुठे निर्माते आमच्या गाइडलाइन्स वाचत आहेत. सर्वच सुरक्षेला प्राधान्य देत आहेत. चित्रीकरणाबाबत अद्याप त्यांच्याशी चर्चा बाकी आहे.’

0