आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OTT रिलीज ऑफ द वीक:या शुक्रवारी असेल थ्रिलर, कॉमेडी आणि रहस्यमयचा मिलाफ, 25 फेब्रुवारीला रिलीज होत आहेत हे 6 चित्रपट आणि वेब सीरिज

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 25 फेब्रुवारीला OTT प्लॅटफॉर्मवर कोणते चित्रपट प्रदर्शित होणार आहेत ते पाहुया -

OTT प्लॅटफॉर्मवर येत्या शुक्रवारी (25 फेब्रुवारी) 'द फेम गेम'सह पाच नवीन चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित होणार आहेत. फेब्रुवारीचा हा शेवटचा शुक्रवार थ्रिलर, कॉमेडी, सस्पेन्स आणि रहस्य यांचा मिलाफ असणार आहे. हे सर्व चित्रपट Netflix, Zee5 आणि Book My Show वर स्ट्रीम केले जातील. 25 फेब्रुवारीला OTT प्लॅटफॉर्मवर कोणते चित्रपट प्रदर्शित होणार आहेत ते पाहुया -

द फेम गेम - Netflix

'द फेम गेम' या चित्रपटाचे शीर्षक आधी 'फाइंडिंग अनामिका' होते, जे नंतर 'द फेम गेम' असे बदलले गेले. या चित्रपटाद्वारे माधुरी दीक्षित ओटीटीवर पदार्पण करत आहे. 'द फेम गेम' हा एक फॅमिली ड्रामा आहे, जो ग्लोबल सुपरस्टारबद्दल आहे. चित्रपटाची अभिनेत्री अचानक गायब झाल्यावर चित्रपटात ड्रामा सुरू होतो.

लव्ह हॉस्टेल- Zee5

या चित्रपटाची निर्मिती शाहरुख खानने मनीष मुंद्रा यांच्या सहकार्याने केली आहे. या चित्रपटात सान्या मल्होत्रा, विक्रांत मैसी आणि बॉबी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट एका तरुण जोडप्यावर आधारित आहे जो एकमेकांसोबत राहण्यासाठी घरातून पळून जातो.

'जुवेनाइल जस्टिस' - Netflix

'जुवेनाइल जस्टिस' नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. हा एक कोरियन ड्रामा आहे. शिम उन-सोको या चित्रपटात बाल न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या भूमिकेत दिसणार आहे. या अवतारात सोको काही गुंतागुंतीच्या बाबी हाताळताना दिसेल.

वाइकिंग्स वल्लाह - Netflix

'वाइकिंग्स वल्लाह' ही एक हिस्टोरिकल ड्रामा सीरिज आहे. ही सीरिज जेब स्टुअर्टने तयार केली आहे. ही सीरिज 'हिस्ट्री वाइकिंग्स'चा सिक्वेल आहे. 'वाइकिंग्स वल्लाह' ओरिजनल सीरिजच्या दहा वर्षांनंतर येत आहे, ज्यामध्ये नॉर्समॅनच्या काही प्रसिद्ध इतिहास कथा आहेत.

रेस्टलेस -Netflix

'रेस्टलेस' हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट एका भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याभोवती फिरतो जो घटना लपवण्यासाठी कोणत्याही थराला जातो. पण जेव्हा एक रहस्यमय साक्षीदार त्याला ब्लॅकमेल करतो तेव्हा गोष्टी वाईट होतात.

द स्पीच-Book my show

'द स्पीच' चित्रपटाचे दिग्दर्शन लॉरेंट टिरार्ड यांनी केले आहे. हा एक मजेदार विनोदी चित्रपट आहे. हा चित्रपट एका माणसावर आधारित आहे, ज्याला त्याची गर्लफ्रेंड सोडून देते. तो मुलगा फॅमिली डिनरमध्ये तिच्या मेसेजची वाट पाहत असतो. अशी या चित्रपटाची कथा आहे.

बातम्या आणखी आहेत...