आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनाली फोगाट यांचे निधन:या BIG BOSS सेलिब्रिटींचाही झाला मृत्यू, कोणी केली आत्महत्या, कोणाला आला हृदयविकाराचा झटका

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग बॉस 14' मध्ये झळकलेल्या सोनाली फोगाट यांचे 23 ऑगस्ट रोजी गोव्यात निधन झाले. टिकटॉक स्टार आणि हरियाणातील भाजप नेत्या सोनाली यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे. सोनाली यांनी बिग बॉस 14 मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री घेतली होती. आणि त्या 34 दिवस घरात राहिल्या होत्या. सोनाली व्यतिरिक्त बिग बॉसमध्ये झळकलेले इतर सेलिब्रिटी आहेत ज्यांचा काही कारणांमुळे मृत्यू झाला आहे. जाणून घेऊया त्या सेलिब्रिटींविषयी -

सिद्धार्थ शुक्ला

बिग बॉस 13 चे विजेतेपद पटकावणाऱ्या सिद्धार्थ शुक्लाला या शोमध्ये खूप प्रेम मिळाले. 2 सप्टेंबर 2021 रोजी वयाच्या 40 व्या वर्षी सिद्धार्थचे निधन झाले. त्याच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले होते.

प्रत्युषा बॅनर्जी​​​​​​​

प्रत्युषा बॅनर्जीने बालिका वधू या मालिकेतून घराघरांत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली हगोती. यानंतर ती बिग बॉस सीझन 7 मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. 63 दिवस घरात राहिल्यानंतर ती घराबाहेर पडली होती. 2016 मध्ये प्रत्युषाने वयाच्या 24 व्या वर्षी आत्महत्या केली होती. रिपोर्ट्सनुसार, तिने आपल्या राहत्या घरी गळफास घेतला होता. या घटनेनंतर तिचा प्रियकर राहुल राजवर तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला होता.

स्वामी ओम

बिग बॉस 10 चे स्पर्धक स्वामी ओम यांचे 3 फेब्रुवारी 2021 रोजी निधन झाले होते. त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यांचे वयाच्या 63 व्या वर्षी निधन झाले. बिग बॉसच्या 10व्या सीझनमध्ये ते वादांमुळे खूप चर्चेत होते.​​​​​​​

जेड गुडी​​​​​​​​​​​​​​

बिग ब्रदर 5 मध्ये दिसलेली जेड गुडी बिग बॉस सीझन 2 मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. तिला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाल्याचे निदान झाल्याने अवघ्या 5 दिवसांनी तिने हा शो सोडला होता. 2009 मध्ये वयाच्या 27 व्या वर्षी तिचे निधन झाले होते. हॉलिवूड रिअॅलिटी शो 'बिग ब्रदर'नंतरच 'बिग बॉस' हा शो सुरु झाला होता.

बातम्या आणखी आहेत...