आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा2022 चे सुरुवातीचे 6 महिने चित्रपट इंडस्ट्रीसाठी चांगले राहिले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच चित्रपटसृष्टीने अनेक उत्तमोत्तम चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत. एकीकडे साऊथचा चित्रपट KGF2 चा दबदबा आहे, तर दुसरीकडे द काश्मीर फाइल्सने देखील आपल्या कमाईने लोकांना आश्चर्यचकित केले आहे.
या वर्षात प्रदर्शित झालेल्या काही चित्रपटांनी 200 कोटींचा मोठा आकडा सहज पार केला होता. चला तर मग जाणून घेऊया या चित्रपटांबद्दल-
KGF 2
सुपरस्टार यश स्टारर चित्रपटाने जगभरात 1240 कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने अवघ्या 5 दिवसात 200 कोटींचा टप्पा पार केला.
आरआरआर
एसएस राजामौली दिग्दर्शित या चित्रपटाने जगभरात 1100 कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात 200 कोटींचा व्यवसाय केला होता.
द काश्मीर फाइल्स
वादाची झालर असलेल्या या चित्रपटाने वर्ल्ड वाइड बॉक्स ऑफिसवर 337 कोटींची कमाई केली. रिलीजच्या केवळ 14 दिवसांतच या चित्रपटाने 200 कोटींचा टप्पा गाठला होता.
गंगुबाई काठियावाडी
आलिया भट्ट स्टारर या चित्रपटाने अवघ्या 13 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा गल्ला जमवला होता. तसेच या चित्रपटाने जगभरात 209 कोटींचे कलेक्शन केले होते.
सरकारु वारी पाता
साऊथ सुपरस्टार महेश बाबू आणि कीर्ती सुरेश स्टारर या चित्रपटाने 12 दिवसांत 200 कोटींचा टप्पा पार केला.
भीमला नायक
पवन कल्याण आणि राणा दग्गुबती स्टारर चित्रपटानेही 200 कोटींचा टप्पा गाठला. या चित्रपटाने जगभरात 200 कोटींची कमाई केली होती.
राधेश्याम
प्रभास स्टारर या चित्रपटाने सुरुवातीला फारशी कमाई केली नाही, मात्र दोन आठवड्यांत या चित्रपटाने 200 कोटींचा टप्पा पार केला. तसेच, या चित्रपटाने वर्ल्ड वाइड बॉक्स ऑफिसवर 214 कोटींची कमाई केली होती.
विक्रम
कमल हासन स्टारर या चित्रपटाने 17 दिवसांत 200 कोटींचा टप्पा ओलांडला होता. तसेच, या चित्रपटाने आतापर्यंत वर्ल्ड वाइड बॉक्स ऑफिसवर 350 कोटींहून अधिकची कमाई केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.