आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • These Films, Which Were Shot In A Few Days, Did Good Earnings, The Blast Was Completed In 10 Days And The Rascals Were Completed In 16 Days.

बॉक्स ऑफिस ट्रेंड:कमी काळात चित्रीत झालेल्या चित्रपटांनी तिकिटबारीवर केली चांगली कमाई, 'धमाका' 10 तर 'हरामखोर' 16 दिवसांत झाला होता पूर्ण

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घेऊया या चित्रपटांविषयी -

बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. यापैकी एखाद्या चित्रपटाचे बजेट खूप जास्त असते, तर कधी त्याचा चित्रीकरणाचा कालावधी खूप जास्त असतो. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा काही चित्रपटांबद्दल सांगतोय, ज्याचे चित्रीकरण निर्मात्यांनी फार कमी वेळेत पूर्ण केले आणि त्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील केली. जाणून घेऊया या चित्रपटांविषयी -

धमाका

कार्तिक आर्यन आणि मृणाल ठाकूर स्टारर 'धमाका' चित्रपटाचे दिग्दर्शन राम माधवानी यांनी केले होते. हा चित्रपट अवघ्या 10 दिवसांत शूट झाला आहे. कार्तिक आर्यनने या चित्रपटाच्या 10 दिवसांच्या शूटसाठी तब्बल 20 कोटी रुपये घेतले होते. या चित्रपटाचे बजेट 35 कोटी होते आणि हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

हरामखोर

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि श्वेता त्रिपाठी यांच्या 'हरामखोर' या चित्रपटात एका शिक्षक आणि त्यांच्या विद्यार्थिनीची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने शिक्षकाची तर श्वेता त्रिपाठीने विद्यार्थिनीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट श्लोक शर्मा यांनी दिग्दर्शित केला होता.

जॉली एलएलबी 2

अक्षय कुमार आणि हुमा कुरैशीच्या 'जॉली एलएलबी 2' या चित्रपटाने वर्ल्डवाइड 197.34 कोटींची कमाई केली. दिग्दर्शक सुभाष कपूर यांची चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती.

तनु वेड्स मनु रिटर्न्स

कंगना रनोटच्या तनु वेड्स मनु रिटर्न्स या चित्रपटाचे शूटिंग अवघ्या 30 दिवसांत पूर्ण झाले. दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या चित्रपटात आर माधवनचीही महत्त्वाची भूमिका होती. या चित्रपटाने एकूण 252 कोटींची कमाई केली होती.

हाउसफुल्ल 3

साजिद-फरहाद सामजी दिग्दर्शित मल्टीस्टारर 'हाऊसफुल 3'चे शूटिंग अवघ्या 38 दिवसांत पूर्ण झाले. या चित्रपटाने जगभरात 195 कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटात अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जॅकलिन फर्नांडिस, लिसा हेडन, नर्गिस फाखरी यांच्या भूमिका आहेत.

की अँड का

करीना कपूर आणि अर्जुन कपूर यांच्या 'की अँड का' या चित्रपटाचे शूटिंग अवघ्या 45 दिवसांत पूर्ण झाले. आर बाल्की दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करत 98.31 कोटींची कमाई केली.

ऑक्टोबर

शुजित सरकार दिग्दर्शित या चित्रपटाचे शूटिंग 38दिवसांत पूर्ण झाले. या चित्रपटात वरुण धवनसोबत बनिता संधूने मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपटाचे शूटिंग दिल्ली आणि हिमाचल प्रदेशमध्ये झाले.

बातम्या आणखी आहेत...