आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • These Films Will Be In Theaters On The Day Of National Cinema Day, From Brahmastra To Avatar, The Cost Of These Films Will Be Only Rs 75

राष्ट्रीय चित्रपट दिनी या चित्रपटांची ट्रीट:'ब्रह्मास्त्र' ते 'अवतार'पर्यंत, या चित्रपटांच्या तिकिटांचा दर असेल फक्त 75 रुपये

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

23 सप्टेंबर रोजी देशभरात राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने 4500 हून अधिक चित्रपटगृहात केवळ 75 रुपयांमध्ये चित्रपट दाखवले जाणार आहेत. चित्रपट दिनानिमित्त देशभरातील चित्रपटगृहे या मोहिमेचा एक भाग असतील, असा निर्णय मल्टिप्लेक्स असोसिएशनने घेतला आहेत. या यादीमध्ये अनेक चित्रपटांचा समावेश आहे, चला या चित्रपटांवर एक नजर टाकूया ज्याचा तुम्ही राष्ट्रीय चित्रपट दिनी आनंद घेऊ शकता.

'ब्रह्मास्त्र'

'ब्रह्मास्त्र' हा या वर्षाचा बहुचर्चित चित्रपट आहे. जर तुम्ही अद्याप चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहिला नसेल, तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. चित्रपटात VFX चा भरपूर तडका असून चित्रपटाची कथा तुम्हाला शस्त्रांच्या दुनियेत घेऊन जाईल. हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

सीता रामम​​​​​​​

मृणाल आणि दुलकर सलमान यांच्या सीता रामम या चित्रपटाने तामिळ, तेलुगू आणि मल्याळममध्ये आपली छाप उमटवल्यानंतर आता हिंदीतही प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. चित्रपटाची कथा 1964 मधील सीता रामम यांच्या प्रेमकथेभोवती फिरते. या चित्रपटात सलमानने सैनिकाची भूमिका साकारली आहे, तर मृणाल त्याची मैत्रीण बनली आहे. सीता रामम ही एक सुंदर रचलेली प्रेमकथा आहे ज्याचा तुम्ही तुमच्या जोडीदारासो​​​​​​​बत आनंद घेऊ शकता.

अवतार

2009 मध्ये प्रदर्शित झालेला जेम्स कॅमेरॉनचा 'अवतार' हा चित्रपटही 23 सप्टेंबर रोजी पुन्हा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा सिक्वेल डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. यापूर्वी, निर्मात्यांनी चित्रपटाचा पहिला भाग पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही हा चित्रपट राष्ट्रीय चित्रपट दिनी देखील पाहू शकता. हा चित्रपट देशभरात इंग्रजीमध्ये प्रदर्शित होणार आहे.

धोका: द राउंड टेबल

धोका: द राउंड टेबल हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. चित्रपटात एका शहरी जोडप्याची कथा गुंफण्यात आली आहे. एकेदिवशी काही दहशतवादी आर माधवनच्या पत्नीचे अपहरण करतात. अपारशक्ती खुराणा या चित्रपटात दहशतवाद्याची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट ट्विस्टने भरलेला आहे, त्यामुळे जर तुम्ही मॅडीचे चाहते असाल तर हा चित्रपट तुमच्यासाठी आहे.

चूप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट​​​​​​​​​​​​​​

चूप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्टची कथा एका किलर भोवती फिरते, ज्याला कलेची आवड आहे. एक पोलिस अधिकारी त्याच्या शोधात असतो. या किरलच्या निशाण्यावर चित्रपटांना रेटिंग देणारे समीक्षक असतात. रिलीज होण्याआधीच या चित्रपटाबाबत लोकांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. अशा परिस्थितीत 75 रुपयांत हा चित्रपट बथने वर्थ इट आहे.

शकिनी डाकिनी ​​​​​​​​​​​​​​

शकिनी डाकिनी ही दोन महिला पोलिस प्रशिक्षणार्थींची कथा आहे ज्या एका मुलीचे अपहरण झाल्याच्या साक्षीदार असतात. मात्र स्थानिक पोलिसांकडून मदत न मिळाल्याने मुली स्वत:च या तपासात अडकतात. जर तुम्हाला हिंदी भाषेतील तेलुगू चित्रपट पहायचे असतील तर तुम्ही राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त शकिनी डाकिनी पाहू शकता.

सिया​​​​​​​​​​​​​​

सिया हा चित्रपट एका सामूहिक बलात्कार झालेल्या मुलीची कथा आहे. चित्रपटाची कथा सियाच्या न्यायासाठीच्या लढ्यावर आधारित आहे. जर तुम्हाला एखाद्या संवेदनशील विषयावरचा चित्रपट पाहायचा असेल तर तुम्ही सिया हा चित्रपट बघू शकता.

75 रुपयांमध्ये तुम्ही हे चित्रपटदेखील पाहू शकता
तुम्ही अल्लुरी, ओके ओका जीविथम, जहाँ चार यार, मिडल क्लास लव्ह, कृष्णा वृंद विहारी आणि प्रेम गीत सारखे चित्रपट 75 रुपयांमध्ये पाहू शकता.

75 रुपयांत तिकीट कसे काढायचे?
75 रुपयांचे तिकीट खरेदी करण्यासाठी तुम्हाला सिनेमा हॉलच्या बाहेरून तिकीट खरेदी करावे लागेल. याशिवाय, तुम्ही ऑनलाइन माध्यमातूनही तिकीट खरेदी करू शकता, परंतु त्यासाठी तुम्हाला जीएसटी आणि इंटरनेट शुल्क स्वतंत्रपणे भरावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...