आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Third Day Of Riya's Interrogation Of NCB News And Updates: Riya Will Be Questioned Again In Drug Case, Arrest Possible; Case Filed Against Sushant's Sister Priyanka For Abetment To Suicide

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांतच्या मृत्यूच्या 84 दिवसांनी रिया अटकेत:ड्रग्ज प्रकरणात 3 दिवसांच्या चौकशीनंतर रियाला अटक; एनसीबी म्हणाले- जी चौकशी करायची होती ती केली असून कस्टडी नको, मात्र जामीनाला विरोध करणार

मुंबई5 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची टीम रिया (काळ्या ड्रेसमध्ये) ला मेडिकल चेकअपसाठी घेऊन जाताना. - Divya Marathi
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची टीम रिया (काळ्या ड्रेसमध्ये) ला मेडिकल चेकअपसाठी घेऊन जाताना.
 • एनसीबीने तीन दिवसांत रियाची जवळजवळ 20 तास चौकशी केली.
 • मंगळवारी एनसीबीकडून रियाला अटक करण्यात आली आहे. तत्पूर्वी सोमवारी तिची आठ तास चौकशी झाली. एनसीबीने तिचा भाऊ शोविक समोर बसून तिची चौकशी केली.
 • सुशांतला चुकीची औषधे दिल्याचा आरोप करत रियाने सुशांतची बहीण प्रियांकाविरोधात एफआयआर नोंदविला

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या 84 दिवसानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) मंगळवारी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला ड्रग्ज प्रकरणात अटक केली. रियाची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. तिचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे .एनसीबीने हे स्पष्ट केले आहे की, ते रियाचा रिमांड घेऊ इच्छित नाही, कारण एजन्सीने आवश्यक ती सर्व चौकशी पूर्ण केली आहे. मात्र, रियाच्या जामिनाला विरोध करणार असल्याचे एनसीबीने म्हटले आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रियाला थोड्या वेळात कोर्टात हजर केले जाईल. जेथे तिच्या जामीनावर निर्णय होईल. ड्रग्ज प्रकरणातील अन्य आरोपी शोविक, सॅम्युअल मिरांडा आणि दीपेश सावंत यांनाही हजर केले जाईल.

तीन दिवसांत 20 तास झाली चौकशी

एनसीबीकडून रियाच्या चौकशीचा आज तिसरा दिवस होता. मागील तीन दिवसांत जवळजवळ 20 तास रियाला प्रश्नोत्तरे केली गेली. तत्पूर्वी सोमवारी रिया, तिचा भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि घरगडी दीपेश सावंत यांना समोरासमाेर बसवून चौकशी केली होती. जवळजवळ आठ तासांच्या चौकशीत रियाने स्वतः ड्रग्जचे सेवन केल्याचे कबुल केले नव्हते. मात्र ड्रिंक आणि स्मोकिंग करत असल्याचे मान्य केले. रियाच्या म्हणण्यानुसार, तिने जे काही केले ते फक्त सुशांतसाठी केले. मात्र आजच्या चौकशीत सुशांत ड्रग्ज घ्यायला भाग पाडत असल्याचा दावा तिने केला.

रियाला अटक झाल्यानंतर सुशांतच्या बहिणीचे ट्विट - देव आमच्यासोबत आहे.

 • रियाचे सत्य समोर आलेः बिहारचे डीजीपी

बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे म्हणाले की, रियाविरूद्ध एनसीबीकडे पक्के पुरावे आहेत. रियाचा ड्रग्ज पेडलर्सशी संबंध होता, हे आता उघड झाले आहे. याची पुष्टी झाल्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

 • रियाचे वकिल म्हणाले - सुशांत ड्रग्ज अॅडिक्ट होता

रियाचे वकिल सतीश मानशिंदे म्हणाले की, एका महिलेने ड्रग्जचे व्यसन असलेल्या व्यक्तीवर प्रेम केले म्हणून तीन तपास यंत्रणा तिच्या मागे लागल्या आहेत. सुशांत अनेक वर्षे मानसिकदृष्ट्या आजारी होता आणि बंदी असलेली औषधे खाल्ल्यामुळे त्याने आत्महत्या केली होती.

 • रिया अटकेसाठी होती तयार

प्रेम करणे गुन्हा असेल तर या गुन्ह्यासाठी कोणतेही परिणाम भोगण्यास रिया तयार आहे. निर्दोष असल्याने तिने अटक टाळण्याचा प्रयत्न केलेला नाही. ती अटकेसही सज्ज आहे, असे रियाचे वकील सतीश मानशिंदे म्हणाले होते.

आतापर्यंत ड्रग्ज प्रकरणात यांना झाली अटक

28 ऑगस्टला तपासासाठी मुंबईत आलेल्या एनसीबीच्या विशेष पथकाने मागील दहा दिवसांत रियाचा भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, आणि घरगडी दीपेश सावंतसह आठ आरोपींना अटक करून अमली पदार्थ, रोकड आणि परकीय चलन हस्तगत केले. त्यानंतर आता एनसीबीकडून रियाच्या अटकेची मोठी कारवाई झाली आहे. कैजान इब्राहिम, अब्दुल बासित, जैद विलात्रा​​ , अब्बास लखानी, अनुज केसवानी या ड्रग पॅडलरला एनसीबीकडून यापूर्वीच अटक झाली आहे.

सुशांतच्या बहिणीविरोधात रियाने दाखल केली तक्रार

सोमवारी रात्री सुशांत मृत्यू प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आला. सीबीआयच्या गुन्ह्यातील आराेपी रिया चक्रवर्तीने सुशांतची बहीण प्रियांका, डॉक्टर आणि इतरांविरुद्ध फसवणुकीची तक्रार नोंदवली आहे. रियाने मुंबई पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत प्रियांका सिंह, राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे डॉ. तरुणकुमार व इतरांनी सुशांतला बनावट मेडिकल प्रिस्क्रिप्शन दिल्याचा आणि त्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. ही तक्रार सुशांत व त्याच्या बहिणीत 8 जूनच्या व्हॉट्सअॅप चॅटबाबत आहे. याच दिवशी रिया सुशांतचे घर सोडून गेली होती.

 • रियाने काय आरोप केले?

सोमवारी एनसीबी कार्यालय सोडल्यानंतर रियाने वांद्रे पोलिस ठाणे गाठले. तिच्या तक्रारीवरुन सुशांतची बहीण व डॉक्टर तरुण कुमार यांच्यावर भारतीय दंड संहितेतील 420,464, 465, 466, 468, 474, 306 आणि 120 बी कलमानुसार एफआयआर दाखल करण्यात आली आहे. रियाचा आरोप आहे की, प्रियांका सिंहने सुशांत सिंहसाठी औषधांची स्लिप बनवली होती. ती चुकीची आहे, बनावट स्लिप आहे. डॉक्टरांनी सुशांतची तपासणी न करता फक्त प्रियांकाच्या सांगण्यावरुन नैराश्याची औषधे लिहिली होती. ही फसवणूक आहे आणि एनडीपीएस अॅक्ट, टेली मेडिसिन प्रॅक्टिस गाइडलाइन्सचे उल्लंघन आहे.

दुसरीकडे, ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करत असलेल्या एनसीबीच्या चौकशीसाठी रिया सलग तिस-या दिवशी एनसीबीच्या ऑफिसमध्ये पोहोचली आहे. यापूर्वी सोमवारी रियाची आठ तास चौकशी केली. एनसीबीने या प्रकरणात नऊ जणांना अटक केली आहे.

दरम्यान, कोरोनाचा धोका व कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता रिमांडसाठी कोणत्याही आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच सादर करावे, असे आदेश कोर्टाने दिले आहेत..

 • सुशांतच्या कौटुंबिक वकिलांनी यावर प्रतिक्रिया दिली

रियाच्या तक्रारीवर सुशांतच्या कुटूंबाचे वकिल विकास सिंह म्हणाले की, "मुंबई पोलिसांना या प्रकरणाशी कुठले तरी कारण काढून जोडून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. जेणेकरुन हे प्रकरण ते त्यांच्या पद्धतीने हाताळतील आणि सुशांतच्या कुटूंबाचा न्याय मिळणार नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ, कारण हा अवमान करण्याचा विषय आहे. मुंबई पोलिसांना तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही."

 • पोलिसांनी सांगितले- प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले

मुंबई पोलिसांनी म्हटले आहे की, रियाच्या तक्रारीवरून दाखल केलेली तक्रार सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डोळ्यासमोर ठेवून सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे.

 • सुशांतची बहीण श्वेता म्हणाली- एफआयआर चुकीची आहे

श्वेता सिंग किर्तीने ट्विटरवर लिहिले की, "खोट्या एफआयआरने आमचे धैर्य खचणार नाही."

Open Divya Marathi in...
 • Divya Marathi App
 • BrowserBrowser