आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानहानी प्रकरण:हे कोर्ट पक्षपाती, त्यावर माझा विश्वास नाही, प्रथमच मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर झाल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौत म्हणाली...

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री कंगना रनौत सोमवारी प्रथमच मानहानी प्रकरणात मुंबईच्या मॅजिस्ट्रेट कोर्टासमक्ष हजर झाली. मात्र थेट कोर्टावरच आरोप करत ती म्हणाली ‘माझा या कोर्टावर विश्वास राहिलेला नाही. हे पक्षपाती आहे.’

कंगना म्हणाली, ‘कोर्टाने मला अप्रत्यक्षरीत्या धमकी दिली आहे. माझ्याविरुद्धचे प्रकरण जामीनपात्र आहे. तरीही मी पेशीसाठी आले नाही तर वॉरंट जारी करू, असे मला सांगण्यात आले.’ तिचा वकील रिझवान सिद्दिकीने कोर्टाला सांगितले की, ‘आमच्या अशिलास या कोर्टात प्रकरण पुढे सुरू ठेवायचे नाही. आम्ही चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटच्या कोर्टात अर्ज केला आहे.

त्यात हे प्रकरण दुसऱ्या कोर्टाकडे वर्ग करण्याची विनंती केली आहे. आम्हीही गीतकार जावेद अख्तर यांच्याविरुद्ध खटला दाखल केला आहे. त्यात त्यांच्यावर ‘खंडणी व धमकी दिल्याचे’ आरोप केले आहेत. कंगनाविरुद्ध जावेद अख्तर यांनीच अब्रुनुकसानीचा दावा दाखल केलेला आहे.

बातम्या आणखी आहेत...