आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलोगामी:नवरदेवाविना होते खास लग्न, या विषयावर बेतले आहेत हे चित्रपट आणि या वेब सिरिज

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या गुजरातमधील क्षमा बिंदू ही तरुणी तिच्या आगळ्यावेगळ्या लग्नामुळे चर्चेत आहे. क्षमाने स्वतःसोबतच लग्न थाटले असून आता ती एकटीच हनीमूनलादेखील जाणार आहे. लग्नानंतर आता मी विवाहित स्त्री आहे, असे क्षमा म्हणाली आहे. तिच्या लग्नाची खास गोष्ट म्हणजे तिच्या लग्नात सर्व लग्नविधी वराशिवाय करण्यात आल्या.

अशा विवाहाला सोलोगामी म्हणतात. पाश्चिमात्य देशांमध्ये असे घडत असले, तरी भारतात सोलोगामीची ही पहिलीच घटना आहे. या विषयावर चित्रपटही तयार झाले आहेत. सोलोगामी म्हणजे नेमके काय हे समजून घेण्यासाठी तुम्ही हे चित्रपट पाहू शकता. चला तर मग या चित्रपटांबद्दल जाणून घेऊया -

आय मी वेड

या चित्रपटाची कथा इसाबेल डार्डन नावाच्या महिलेवर आधारित आहे. इसाबेल तिच्या जोडीदाराचा शोध घेते, परंतु नंतर, जीवनातील बदलांमुळे आणि काही परिस्थितींमुळे ती स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय घेते. हा 2017 मध्ये रिलीज झालेली कॅनेडियन टीव्ही सिरिज आहे.

ग्ली​​​​​​​

हा चित्रपट ग्ली क्लबच्या लोकांच्या जीवनावर आधारित आहे, जे समाजातील विविध समस्या त्यांच्या पद्धतीने हाताळतात. ग्ली ही अमेरिकन म्युझिकल कॉमेडी ड्रामा टीव्ही सिरिज आहे. 2009 ते 2015 या काळात अमेरिकन वाहिनी फॉक्स नेटवर्कवर ही सिरिज प्रसारित झाली होती.

रोजाज वेडिंग​​​​​​​​​​​​​​

रोजाज वेडिंग हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट रोजा या महिलेवर आधारित आहे, जी तिच्या कामात आणि कुटुंबात अडकलेली असते. पुढे ती स्वतःशी लग्न करून आयुष्य जगण्याचा निर्णय घेते. हा एक स्पॅनिश कॉमेडी चित्रपट आहे.

सेक्स अँड द सिटी​​​​​​​​​​​​​​

सेक्स अँड द सिटी ही अमेरिकन रोमँटिक कॉमेडी-ड्रामा टेलिव्हिजन सिरिज डॅरेन स्टारने HBO साठी तयार केली आहे. हा चित्रपट 2008 मध्ये प्रदर्शित झाला होता.

ऐन विद एन ई

ऐन विद एन ई ही कॅनेडियन टेलिव्हिजन सिरिज आहे. या सिरिजचा प्रीमियर 19 मार्च 2017 रोजी CBC वर आणि 12 मे रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर Netflix वर झाला. या सिरिजमध्ये 13 वर्षीय अॅनची कथा आहे, जी एक अनाथ आहे आणि इतरांच्या घरी काम करते, तिच्या जीवनातील बदलांवर आधारित ही सिरिज आहे.

बातम्या आणखी आहेत...