आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खास बातचीत:'मॅडम चीफ मिनिस्टर'मुळे सोशल मीडियावर रिचा चड्ढाला मिळाली जीवे मारण्याची धमकी, म्हणाली- अशा लोकांना दुर्लक्ष करणे त्यांच्यासाठी धडा आहे

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्रेलरमधील अभिनय बघून रिचाचे कौतुक होत आहे.

अभिनेत्री रिचा चड्ढा आगामी 'मॅडम चीफ मिनिस्टर' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या नावावरून हा पॉलिटीकल थ्रीलर चित्रपट असल्याचे समजते. अलीकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रिचाचा दमदार अभिनय पाहायला मिळतोय. रिचाचे पात्र खूप संघर्ष करून मुख्यमंत्री होते. एकीकडे ट्रेलरमधील अभिनय बघून रिचाचे कौतुक होत आहे, तर दुसरीकडे तिला सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. दिव्य मराठीसोबत झालेल्या संभाषणादरम्यान रिचाने सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी देणा-यांना लोकांना लक्ष्य केले आहे.

हा चित्रपट कोणत्याही रिअल पॉलिटिकल पर्सनॅलिटीवर आधारित नाही

रिचा चड्ढा म्हणाली, "अडचणी तर आता कुठे सुरु झाल्या आहेत. हा चित्रपट खर्‍या नेत्यावर आधारित आहे, या भ्रमात बरेच लोक आहेत. बरेच लोक चित्रपटाला विरोध दर्शवत आहेत. टीका देखील होत आहे. आमच्या नेत्याला तुम्ही असे का दाखवले, असे म्हणत आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकावले जात आहे. पण सत्य हे आहे की आम्ही एक काल्पनिक कथा तयार केली आहे जी कोणत्याही वास्तविक राजकीय व्यक्तिमत्त्वावर आधारित नाही. आता आमच्या चित्रपटाला विरोध दर्शवला जाईल. खरं तर या प्रकारचा निषेध हा आता इंडस्ट्रीचा भाग झाला आहे," असे मत रिचाने व्यक्त केले.

धमकी देणा-यांकडे दुर्लक्ष करणे त्यांच्यासाठी धडा आहे
रिचा चड्ढा पुढे म्हणाली, "आता इंडस्ट्रीमध्ये हा ट्रेंड बनला आहे की चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी लोक पोस्टर्स फोडून अशी धमकी देतात. मलाही अशा प्रकारच्या धमक्या आल्या आहेत. मला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. परंतु याकडे मी फारसे लक्ष देत नाही. ज्या लोकांना आमच्या नावाने प्रसिद्धी मिळवायची आहे त्यांच्यासाठी सर्वात मोठा धडा म्हणजे त्यांच्याकडे लक्ष न देणे. खरं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून छुप्या पद्धतीने बलात्काराची किंवा जीवे मारण्याची धमकी देणारे स्वतःला जबाबदार नागरिक म्हणत असतात," असे रिचाने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...