आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायव्होल्टेज अ‍ॅक्शन ड्रामा:सलमान-शाहरुखच्या अ‍ॅक्शन सीनसाठी 35 कोटींचा सेट, 'टायगर 3'मध्ये सुपरस्टार्सच्या स्टारडमचा निर्माते घेणार फायदा

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलमान खानच्या 'टायगर 3' या चित्रपटात शाहरुख खान जबरदस्त कॅमिओ करणार आहे. 'पठाण'नंतर आता हे दोन्ही स्टार पुन्हा एकदा 'टायगर 3' मध्ये एकत्र झळकणार आहे. ताज्या वृत्तानुसार, या चित्रपटात सलमान आणि शाहरुखचा बिग बजेट अ‍ॅक्शन सीन असणार आहे. या सीनसाठी तब्बल 35 कोटींचा सेट तयार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सुत्रांनुसार, चित्रपटाचे निर्माते आदित्य चोप्रा या दोन स्टार्सच्या स्क्रीन प्रेझेन्सचा पुरेपूर फायदा घेऊ इच्छित आहेत. 'पठाण'च्या शानदार यशानंतर आता प्रेक्षकांना 'टायगर 3' मध्येही अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत.

हायव्होल्टेज अ‍ॅक्शन सीक्वेन्सची तयारी
हिंदुस्तान टाइम्सच्या सूत्रांनुसार, 'जेव्हा एका चित्रपटात सलमान आणि शाहरुखसारखे सुपरस्टार असतात. तेव्हा त्यांच्या सुपर स्टारडमला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाचा असतो. 'पठाण'नंतर 'टायगर 3' मध्ये यापूर्वी कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळणार आहे. 'टायगर 3' मध्ये हाय व्होल्टेज अ‍ॅक्शन सीक्वेन्ससाठी आदित्य चोप्रा यांनी पूर्ण तयारी केली आहे.'

वर्षानुवर्षे स्मरणात राहणारा अ‍ॅक्शन सीक्वेन्स
सूत्रांच्या माहितीनुसार, टायगर 3 या चित्रपटातील अ‍ॅक्शन सीनसाठी दोन्ही खान जवळपास सात दिवस एकत्र शूटिंग करणार आहेत. चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक मनीष शर्मा लोकांना 'पठाण'मध्ये आलेला अनुभव पुन्हा एकदा देण्याचा प्रयत्न करत आहेत. सूत्रांनुसार, अ‍ॅक्शन सीक्वेन्स असा असेल जो अनेक वर्षे लक्षात राहील.

225 कोटी असेल चित्रपटाचे बजेट
सलमान खानचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट 10 नोव्हेंबर 2023 रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमानशिवाय कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी देखील दिसणार आहेत. हा चित्रपट यशराज स्पाय युनिव्हर्सचा एक भाग असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे एकूण बजेट तब्बल 225 कोटी रुपये असणार आहे.

'टायगर 3' नंतरही प्रवास थांबणार नाही
शाहरुख आणि सलमान पहिल्यांदा 1995 मध्ये आलेल्या 'करण अर्जुन' या चित्रपटात एकत्र झळकले होते. हा चित्रपट त्या काळात खूप गाजला होता. त्यानंतर दोघांनी 'हम तुम्हारे हैं सनम'मध्ये एकत्र काम केले. 'कुछ कुछ होता है'मध्ये सलमान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत होता, तर मुख्य भूमिका शाहरुखने साकारली होती. या चित्रपटालादेखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

त्यानंतर शाहरुख खानच्या 2018 मध्ये रिलीज झालेल्या 'झिरो'मध्येही सलमानचा कॅमिओ होता. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पठाण' या चित्रपटात सलमानचा दमदार कॅमिओ पाहायला मिळाला. आता या दोघांना पुन्हा एकदा चित्रपटात एकत्र कास्ट करण्याचे यशराज फिल्म्स सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. पण यावेळी दोघे कॅमिओ भूमिकेत नव्हे तर मुख्य भूमिकेत चित्रपटात झळकणार आहेत.

ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्श यांनी अलीकडेच यशराज स्पाय युनिव्हर्सच्या काही आगामी चित्रपटांचा उल्लेख केला होता. ज्यामध्ये 'वॉर 2', 'टायगर 3' आणि 'टायगर वर्सेस पठाण' या चित्रपटांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती 'टायगर वर्सेस पठाण' या चित्रपटाची. शाहरुख आणि सलमान स्टारर या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा यशराजने सिद्धार्थ आनंदवर सोपवली आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'पठाण' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केले आहेत.