आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'भाईजान'चा आगामी चित्रपट:सलमान खानने फोडला 'टायगर 3' च्या मुहूर्ताचा नारळ, चित्रीकरणाला सुरुवात करण्यापूर्वी कतरिना, इमरान हाश्मीसोबत केली पूजा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सलमानने नारळ फोडून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला हिरवा झेंडा दाखवला.

अभिनेता सलमान खान येत्या 8 मार्चपासून टायगर फ्रँचायझिच्या तिसर्‍या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. तत्पूर्वी यशराज फिल्म्सच्या प्रथेनुसार या चित्रपटाच्या मुहूर्ताची पूजा केली गेली. या पूजेला चित्रपटाचे दिग्दर्शक मनीष शर्मा, मुख्य अभिनेत्री कतरिना कैफ आणि चित्रपटात खलनायकाची भूमिका वठवणारा इमरान हाश्मी सहभागी झाले होते. वृत्तानुसार सलमानने नारळ फोडून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला हिरवा झेंडा दाखवला. 'टायगर 3' या चित्रपटात सलमान लीन अवतारमध्ये दिसणार आहे. या लूकसाठी त्याने फिटनेस ट्रेनर नियुक्त केला आहे.

सलमानने शाहरुखसह 'पठाण'च्या चित्रीकरणाला केली सुरुवात
यासह सलमानने शाहरुख खानसह आगामी ‘पठाण’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. सिनेमाच्या इतिहासातील सर्वात मोठा जासूस चित्रपट म्हणून वर्णन केले जात आहे. नुकताच सलमानला ‘पठाण’ चित्रपटाच्या सेटवर स्पॉट करण्यात आलं. यावरुन सलमानने ‘पठाण’च्या शूटिंगला सुरुवात केल्याचं बोललं जातंय. या अ‍ॅक्शन सिनेमात प्रेक्षकांना शाहरुख आणि सलमानची अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहे. यश राज फिल्म्स स्टुडिओ बाहेर सलमानला स्टॉप करण्यात आलं. सलमानच्या अनेक चाहत्यांनी त्याचे स्टुडिओ बाहेरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सलमान त्याच्या गाडीतून उतरून स्टुडिओत जात असल्याचे चाहत्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसतंय. या चित्रपटात सलमानची मुख्य भूमिका नसली तरी गेस्ट रोलमध्ये झळकणार आहे. यासोबतच दीपिका पादूकोण आणि जॉन अब्राहमचे नावदेखील ‘पठाण’च्या कलाकारांच्या यादीत आहे. यशराज फिल्म्स ‘पठाण’ची निर्मिती करत असून सिद्धार्थ आनंद याचे दिग्दर्शन करणार आहेत.

ईदला रिलीज होणार आहे सलमानचा 'राधे'
सलमान 'अंतिम', 'पठाण' आणि 'टायगर 3' या चित्रपटांपूर्वी 'राधे'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यावर्षी ईदला त्याचा हा चित्रपट रिलीज होणार आहे. सलमानच्या या चित्रपटाला ऑनलाईन प्रदर्शित करण्यासाठी तब्बल 250 कोटींची ऑफर मिळाली होती. परंतु सलमानने ओटीटीला साफ नकार दिला आहे. हा चित्रपट कुठल्याही परिस्थितीत थिएटर मध्येच प्रदर्शित होईल, अशी भूमिका त्याने घेतली आहे. ‘राधे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवा यांनी केले असून, यामध्ये सलमान खानसह दिशा पाटनी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय जॅकी श्रॉफ, जरीना वहाब आणि रणदीप हुडा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका यात आहेत. 'राधे' या चित्रपटाची निर्मिती सलमान खान, सोहेल खान आणि अतुल अग्निहोत्री यांचे बॅनर सलमान खान फिल्म्स, सोहेल खान प्रॉडक्शन्स आणि रील लाइफ प्रॉडक्शन अंतर्गत करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...