आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टायगर 3:मुंबई विमानतळावर CISF जवानाने सलमान खानला रोखले, लोक सोशल मीडियावर करताहेत जवानाचे कौतुक

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रत्येकजण या सीआयएसएफच्या जवानाचे कौतुक करत आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि कतरिना कैफ त्यांचा आगामी चित्रपट 'टायगर 3'च्या शूटिंगसाठी शुक्रवारी रशियाला रवाना झाले आहेत. मुंबई विमानतळावरून सलमानची काही छायाचित्रे आणि व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात तो काळ्या टी-शर्ट आणि डेनिनमध्ये दिसतोय. दरम्यान, आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात सलमान खानला विमानतळावर सीआयएसएफच्या एका जवानाने चौकशीशिवाय आत जाण्यापासून रोखलेले दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर प्रत्येकजण या सीआयएसएफच्या जवानाचे कौतुक करत आहे.

व्हिडिओमध्ये दिसतंय की, सलमान खान विमानतळावर प्रवेश करत असताना सुरक्षेसाठी तैनात असलेल्या विमानतळावरील केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानाने चौकशीशिवाय सलमानला आत जाण्यापासून रोखले. या जवानाने तपासल्यानंतर सलमान खानला आत सोडले. सलमाननेही नियमांचे पालन केले आणि नंतर तो विमानतळाच्या आत गेला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून या जवानाचे खूप कौतुक केले जात आहे.

जवानाचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, एका एका यूजरने कमेंट करताना लिहिले, 'सीआयएसएफच्या जवानाने ज्या प्रकारे रोखले ते पाहून छान वाटले.' तर आणखी एकाने लिहिले, 'याला म्हणतात वर्दीची पॉवर..'

'टायगर 3'चे युरोपियन देशात 45 दिवसांचे शूटिंग शेड्युल आहे. या चित्रपटात सलमान आणि कतरिनासह इम्रान हाश्मी देखील दिसणार आहे. या चित्रपटात इम्रानची नकारात्मक भूमिका असेल. इम्रानच्या एन्ट्री सीनला धमाकेदार बनवण्यासाठी निर्मात्यांनी 10 कोटींपेक्षा जास्त खर्च केल्याचे वृत्त आहे. 'टायगर 3' हा टायगर फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट आहे.

बातम्या आणखी आहेत...