आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Tiger 3: The First Look Of Salman Khan Shooting For Tiger 3 In Russia Surfaced, It Is Difficult To Recognize The Actor In The Golden Beard

'टायगर 3':रशियात 'टायगर 3'चे चित्रीकरण करत असलेल्या सलमान खानचा पहिला लूक आला समोर, गोल्डन दाढीत अभिनेत्याला ओळखणेही झाले कठीण

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फोटोमध्ये सलमानचे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन बघण्यासारखे आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान शुक्रवारी आपल्या आगामी 'टायगर 3'च्या चित्रीकरणासाठी रशियाला रवाना झाला. हा चित्रपट 2012 मध्ये आलेल्या टायगर या चित्रपटाचा तिसरा भाग आहे. या चित्रपटाच्या दुस-या शेड्यूलचे चित्रीकरण रशियात सुरु झाले आहे. आता सोशल मीडियावर या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो व्हायरल झाले आहेत ज्यात सलमानचा या चित्रपटातील लूक पाहायला मिळत आहे.

मागील दोन भागाप्रमाणेच यातही सलमान रॉ एजंट टायगरच्या भूमिकेत दिसणार आहे. सलमान खानच्या एका फॅन पेजवरून 'टायगर 3'मधील फर्स्ट लूकचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये सलमान नेहमीपेक्षा काही वेगळ्याच अवतारात दिसत आहे. सलमान खान लांब केस आणि दाढी असलेल्या वेशात या फोटोत दिसतोय. फोटोमध्ये सलमानचे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन बघण्यासारखे आहे. 'टायगर 3' च्या शूटिंगसाठी सलमानचा भाऊ सोहेल खानचा मुलगा निर्वाणसुद्धा सध्या रशियात आहे.

सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका असलेला 'टायगर ३' या चित्रपटाचे पहिल्या शेड्युलचे शूटिंग टर्की, ऑस्ट्रिया, रूससह एकूण पाच देशांमध्ये झाले आहे. या सीरिजमधील पहिला चित्रपट 'एक था टाइगर'चे दिग्दर्शन कबीर खानने केले होते तर दुसरा चित्रपट 'टाइगर जिंदा है' दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले होते. आता 'टायगर 3'चे दिग्दर्शन मनीष शर्मा करत आहेत.

या चित्रपटात सलमान आणि कतरिना यांच्यासह अभिनेता इम्रान हाश्मी याचीही महत्त्वाची भूमिका आहे. चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटासाठी सलमान, कतरिना आणि इम्रान यांनी अनेक महिन्यांपासून ट्रेनिंग घेत होते. इम्रानचा चित्रपटातील एंट्री सीन धमाकेदार बनवण्यासाठी निर्मात्यांनी 10 कोटी रुपये खर्च केले आहेत. हा चित्रपट बॉलिवूडच्या महागड्या अॅक्शन चित्रपटांपैकी एक असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...