आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टायगरने खरेदी केला नवा आशियाना:अभिनेता टायगर श्रॉफने मुंबईत खरेदी केला 8 BHK फ्लॅट, गुरुजींच्या सांगण्यावरून बहीण कृष्णाने सर्वप्रथम केला गृहप्रवेश

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाड्याच्या घरात राहत होते जॅकी आणि त्यांचे कुटुंब

अभिनेता टायगर श्रॉफने मुंबईत स्वतःचा नवीन आशियाना खरेदी केला आहे. टायगरचे हे नवीन घर 8-बीएचके अपार्टमेंट असून मुंबईतील खार परिसरातील रुस्तमजी पॅरामाउंट येथे आहे. अलीकडेच टायगर त्याच्या कुटुंबासह येथे शिफ्ट झाला आहे. टायगरची धाकटी बहीण कृष्णा श्रॉफने तिच्या भावाच्या नवीन घराबद्दलची एक खास गोष्ट शेअर केली आहे.

टायगरची आई आयशा श्रॉफ यांनी केले घराचे इंटेरिअर डिझाइन

कृष्णाने सांगितले की, तिचे कुटुंब तीन आठवड्यांपूर्वी या नवीन घरात शिफ्ट झाले आहे. यासाठी एक छोटी आणि अत्यंत खासगी पूजा करण्यात आली. घराचे इंटेरियर आमची आई आयशा श्रॉफने डिझाइन केले आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आईला तीन ते चार महिने लागले. कृष्णाने सांगितल्यानुसार, घरात प्रवेश करणारी पहिली व्यक्ती ती होती. कारण त्यांच्या गुरुजींनी कुटुंबाला तसे करण्याचा सल्ला दिला होता.

भाड्याच्या घरात राहत होते जॅकी
कृष्णा म्हणाली, "आम्ही तीन आठवड्यांपूर्वी शिफ्ट झालो, आम्ही चौघे - बाबा (जॅकी), आई (आयशा), टायगर आणि मी एकत्र पूजा केली. आता आम्ही येथे शिफ्ट झालो आहोत आणि घरील प्रत्येक भागावर प्रेम करतोय. आम्ही पुर्वी कार्टर रोडस्थित ज्या फ्लॅटमध्ये राहात होते, ते घर भाड्याचे होते. आता हे आमचे स्वतःचे घर आहे." उल्लेखनीय म्हणजे, टायगरच्या नवीन घराजवळ हार्दिक पंड्या, राणी मुखर्जी आणि कुणाल पंड्या हे सेलिब्रिटी वास्तव्याला आहेत.

टायगरच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे म्हणजे, तो सध्या हिरोपंती 2 चे शूटिंग करत आहे. यानंतर तो गणपत चित्रपटाचे शूटिंग करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...