आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टायगर श्रॉफचा आगामी सिनेमा:‘गणपत’मध्ये वडिलांच्या मृत्यूचा सूड घेताना दिसेल टायगरचे पात्र, बॉलिवूडच्या फाइट मास्टरवर आधारित आहे कथा

अमित कर्ण6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टायगरचे पात्र वडिलांच्या वैऱ्यांना संपवते.

टायगर श्रॉफचा दुसरा सिंगल म्युझिक व्हिडिओ ‘कॅसेनोवा’ नुकताच रिलीज झाला. आता तो पुन्हा शूटिंगकडे वळला आहे. फेब्रुवारीपासून तो विकास बहल यांच्या ‘गणपत’ची शूटिंग सुरू करणार आहे. येथेदेखील तो आपल्या चिरपरिचित अ‍ॅक्शन रूपात दिसणार आहे. चित्रपटाशी जोडलेल्या सूत्रांनी सांगितले, यात तो आपल्या वडिलांच्या मृत्यूचा सूड घेणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. यात त्याचे वडील एक फाइट मास्टर असतात, त्याला त्याचेच विश्वासू लोक मारून टाकतात. त्यामुळे टायगरचे पात्र वडिलांच्या वैऱ्यांना संपवते.

विकासच्या या चित्रपटात भरपूर अ‍ॅक्शन दिसणार आहे. चित्रपटाची कथा बॉलिवूडच्या एका फाइट मास्टरच्या प्रवासावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्या फाइट मास्टरचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे.

‘डॅडली’सोबत चालणार ‘गणपत’चे शूटिंग
चित्रपटात टागयरच्या अ‍ॅक्शनवर फोकस करण्यात आला आहे. त्याच्यासोबत यात एखाद्या नव्या चेहऱ्याचा शोध घेतला जात आहे. टायगरने चार दिवस आधीपासूनच सराव आणि बैठका
घेणे सुरू केले आहे. फेब्रुवारीमध्येच तो याचे शूटिंग सुरू करणार आहे. त्यानंतर मार्चमध्ये काही भागाचे शूटिंग करण्यात येईल. या महिन्यात विकासदेखील अमिताभ बच्चनसोबत
आपल्या ‘डॅडली’चे शूटिंग सुरू करणार आहेत. त्यामुळे या दोन्ही चित्रपटाचे शूटिंग सोबतच सुरू राहिल.

‘डॅडली’मध्ये बिग बींसोबत झळकणार रश्मिका

दुसरीकडे दक्षिण भारतीय अभिनेत्री रश्मिका मंदाना अमिताभ बच्चनसोबत विकासच्या ‘डॅडली’ चित्रपटात दिसणार आहे. येथे ती अॅक्शनऐवजी भावनांवर लक्ष केंद्रित करणार आहे. या चित्रपटात अमिताभ रश्मिकाच्या वडिलाच्या भूमिकेत आहेत. यापूर्वी त्यांनी ‘पीकू’ चित्रपट केला होता, तोही बाप-लेकीच्या नात्यावर आधारित होता, हा चित्रपट ‘पीकू’ पासून थोडा वेगळा आहे. त्याचे शूटिंग 22 मार्चपासून सुरू होईल. या सर्वांव्यतिरिक्त विकासने नुकतेच वेब शोचे शूटिंगही पूर्ण केले आहे.

बातम्या आणखी आहेत...