आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
90 च्या दशकात सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक असलेल्या 'खलनायक’च्या सिक्वेलची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. संजय दत्त या चित्रपटासाठी टायग श्रॉफला घेणार असल्याचीही चर्चा आहे. चित्रपटाच्या सूत्रानुसार, संजयने या चित्रपटासाठी स्वत:च कथा तयार केली आहे. यात टायगर एंटी हीरोच्या भूमिकेत दिसेल.
यामुळे रखडला चित्रपट
संजयच्या कथेत जॅकी श्रॉफचे पात्र नसणार. जॅकीनेदेखील यावर आपला सहमती दाखवली आहे. त्याच्यानुसार त्याचे पात्र आणखी ताणणे योग्य नाही. दुसरीकडे सुभाष घई म्हणाले, जॅकीला चित्रपटात काम करण्यासाठी राजी करू शकतो. एवढेच नव्हे तर घई गंगाच्या भूमिकेसाठी माधुरीला पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दाखवू शकतात. घईंच्या या कथेवर टायगर आपला होकार कळवणार होता तोच घईने त्याला दुसऱ्या चित्रपटाची ऐकवली. ते टायगर आणि संजय यांना घेऊन दुसरी कथा तयार करणार होते. मात्र याच चित्रपटावर त्यांची चर्चा फिसकटली. त्यामुळे, 'खलनायक 2’ रखडला.
संजयच्या कथेत ड्रग्स सिंडिकेटचा एक भाग असेल टायगर
संजूच्या कथेनुसार, चित्रपटात टायगर ड्रग्सची तस्करी करणाऱ्या युवकाची भूमिका साकारणार आहे. त्याचे वडील या जगात नसतात. अशा वेळी त्याची आई आपल्या मुलाला माफियाच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी तुरुंगात बंद असलेल्या बल्लू (संजयचे पात्र)ची मदत घेते. बल्लू तुरुंगातून बाहेर कसा येणार आणि तो कशा प्रकारे गंगाच्या मुलाला या जाळ्यातून बाहेर काढणार याची कथा स्वत: संजूने तयार केली आहे.
सुभाष घईंनी ऐकवली होती कथा
विशेष म्हणजे यापूर्वी टायगरला सुभाष घईंनी एक वेगळी कथा ऐकवली होती. सुभाष घईंच्या कथेत टायगर एक प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत होता. मात्र त्या कथेवर टायगरने कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र संजयच्या कथेत टायगरने रस दाखवला. चित्रपट ‘वॉर’ मध्ये एंटी हीरोची भूमिका केल्यानंतर टायगर त्याच धाटणीच्या भूमिका करू पाहत आहे. आता संजय 'शमशेरा’ आणि 'भुज’च्या शूटिंगनंतर तिघे बसून या चित्रपटावर चर्चा करतील आणि कथा कशी असेल हे ठरवतील.
आम्ही मिळून स्क्रिप्ट तयार केली, लवकरच घोषणा करू
सुभाष घई म्हणाले, 'संजय पूर्णपणे बरा झाल्यावर आम्ही खलनायक 2 चित्रपटावर काम करू. देवाची कृपा आहे तो आता बरा आहे. कामही करत आहे. लवकरच यावरदेखील काम सुरू करू. आता सर्वांनी मिळून एक स्क्रिप्ट तयार केली आहे. लवकरच याची घोषणा करण्यात येईल.'
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.