आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटायगर श्रॉफच्या आगामी ‘रॅम्बो’ चित्रपटात सुपरस्टार प्रभासची एंट्री होणार असल्याची चर्चा होती. टायगर त्याच्या इतर चित्रपटांमध्ये व्यग्र असल्यामुळे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद त्याच्या जागी प्रभासला घेणार असल्याचे बोलले जात होते. मात्र अशा बातम्यांमुळे बॉलिवूड वर्तुळात आणि टायगरच्या चाहत्यांमध्ये खळबळ माजली होती. ही बातमी सोशल मीडियावरदेखील आली होती. त्यामुळे आता या बातम्यांवर स्वत: टायगरने स्पष्टीकरण दिले आहे. त्याने अशा प्रकारच्या सर्व बातम्या अफवा असल्याचे सांगितले आहे.
टायगर म्हणाला, ही बातमी निरर्थक आहे. अशा प्रकारच्या बातम्या कुठुन येतात कळत नाही. असो, त्यामुळे टायगर या चित्रपटाचा भाग राहिल यावरून स्पष्ट होते.
रिपोर्ट्समध्ये सांगितले गेले की, टायगरने आपल्या तारखा 'गणपत' पार्ट 1 आणि पार्ट 2, 'हीरोपंती 2' आणि 'बागी 4' यासाठी दिल्या आहेत. त्यामुळे ऑगस्ट अखेरपर्यंत त्याच्याजवळ रॅम्बोसाठी वेळ नाही. त्यामुळे सिद्धार्थ आनंद यांनी दुस-या अभिनेत्याला घेऊन चित्रपट पूर्ण करण्याचे ठरवले होते. प्रभासला चित्रपटाची स्क्रिप्ट आवडल्याचा दावादेखील करण्यात आला होता. मात्र आता टायगरने या सर्व गोष्टी निरर्थक असल्याचे म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.