आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरव्ह्यू:पैसा कमावण्याच्या स्पर्धेमुळे ही सगळी गडबड झाली, बॉलिवूडमधील घराणेशाहीवर तिग्मांशू धुलिया म्हणाले...

उमेश कुमार उपाध्याय, मुंबई3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मी काही ग्रुप पाहिले आहेत, जे सशक्त आहेत.

तिग्मांशू धुलिया दिग्दर्शित चित्रपट ‘यारा’ झी 5 वर रिलीज झाला. यात 10 वर्षांपासून ते 55 वर्षांपर्यंतच्या चार मित्रांची मैत्री दाखवली आहे. हा चित्रपट आणि बॉलिवूडमधील घराणेशाहीवर तिग्मांशू यांच्याशी झालेली चर्चा

  • इंडस्ट्रीत तुम्हाला तीन दशके झाली आहेत. कास्टिंग डायरेक्टर ते निर्मिती सर्वच क्षेत्रात तुम्ही काम केले. येथे घराणेशाही आहे का ?

हो, 1989 मध्ये नाट्यशास्त्रात पास झाल्यानंतर येथे काम करत आहे. येथे घराणेशाही तर आहेच यात काही शंका नाही. खरं तर ती सर्वच ठिकाणी असते. मात्र, येथील घराणेशाही ऐकण्यात लोकांना मजा येते. यामुळे कधी कधी नुकसान होते, तर कधी कधी चांगलेही होते. याचे दोन पैलू आहेत. एखादा चित्रपट बनवायला घेतला तर दीड किंवा दोन वर्षे लागतात. त्यामुळे जे आपल्यासोबत कम्फर्ट असतात अशा लोकांसोबत तुम्ही काम करू लागता. कारण, त्यांच्यासोबत दीड वर्ष घालवायचे आहे. त्यामुळे एक ग्रुप तयार होतो. त्यानंतर पुढेही तुम्ही त्याच लोकांसोबत काम करण्याचे मन बनवता. मी काही ग्रुप पाहिले आहेत, जे सशक्त आहेत. त्यांचे कामही चांगले आहे. उदा- एक्सेल, फरहान अख्तर यांचे चित्रपट चांगले असतात. ओटीटी माध्यमावरही त्यांचे काही शो सुरू असतात. लोकांनादेखील ते आवडतात. यांचा ग्रुप पॉझिटिव्ह ग्रुप आहे. बाकी इतरही ग्रुप आहेत, जे निकृष्ट काम करत आहेत, मात्र स्वत:ला श्रेष्ठ समजत आहेत. बाहेरही प्रतिभा आहे हे ते पाहतच नाहीत. लोकांना काम देत नाहीत. अशा लोकांचा आणि ग्रुपचा काय फायदा ? पैसा कमावण्याच्या स्पर्धेमुळे सर्व गडबड झाली आहे.

  • काही महिन्यांपूर्वी कास्टिंग डायरेक्टरवर आपल्या ओळखींच्या लोकांना घेतल्याचे आरोप लागले होते, यावर काय म्हणाल ?

निर्णायक दिग्दर्शक फक्त एक पद आहे. कास्टिंग डायरेक्टर कधीही दिग्दर्शक होत नाही. मी स्वत: हे पद सांभाळले आहे. पूर्वी तर हे पदही नव्हते. या पदाचे काम फक्त ऑडिशन घेऊन ते दिग्दर्शकाला दाखवण्याचे आहे. अंतिम निर्णय त्यांचाच असतो. येथे बरेच जण कास्टिंग डायरेक्टर अभिनेते आहेत. अभिनयासाठी आले, पण घर चालवण्यासाठी डायरेक्टर बनले. अभिनयासाठी आले आणि स्वत:चे प्रमोशनही करत आहेत.

  • तुम्ही ‘ददुआ’ चित्रपटावर काम करत होता, त्याचे काय झाले? पुढे काय करणार आहात ?

हा ‘ददुआ’ बुंदेलखंड भागाचा होता. 35 वर्षे त्याने धुमाकूळ घातला होता. त्याला स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) ने संपवले. आमचा चित्रपट एसटीएफवर आधारित आहे, ददुआवर नाही. ददुआला मारण्यासाठी एसटीएफचे जे ऑपरेशन हाेते त्यावर हा चित्रपट आधारित होता. अजून याची निवड झाली नाही. याची स्क्रिप्ट नुकतीच संपली आहे. लोकांना भेटणे सुरूच केले हाेते, तेव्हाच लॉकडाऊन लागले. याशिवाय एक-दोन शोज आहेत. एक हॉट स्टारवर आहे, सिक्स सस्पेक्टस. याच्या लेखनाचे कामही पूर्ण झाले आहे. त्यानंतर प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू होईल. विकास स्वरूप यांची एक कादंबरी आहे, त्यावर सिक्स सस्पेक्टस शो बनवत आहे. यांच्या कादंबरीवर ‘स्लम डॉग मिलेनियर’ चित्रपट बनला होता. दुसरा चित्रपट विद्यार्थी चळवळीवर बनवण्याचा विचार आहे. तो उत्तर प्रदेशवर आधारित आहे. त्याचे नाव ‘गर्मी’ आहे. यावर काम सुरू आहे. हा काहीसा ‘हासिल’ चित्रपटासारखा आहे.