आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
टीना मुनीम त्यांचा 64 वा वाढदिवस साजरा करत आहेत. गुजराती कुटुंबात जन्मलेल्या टीना यांना लहानपणापासूनच ग्लॅमर वर्ल्डचा भाग व्हायचे होते. त्यांना सुरुवातीपासूनच अभिनय आणि मॉडेलिंगचा शौक होता. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी 'देस परदेस' या चित्रपटाद्वारे बॉलिवूड करिअरची सुरुवात करणार्या टीना यांनी 'लूटमार', 'मनपसंद', 'रॉकी', 'सौतन' आणि 'कर्ज' सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
टीना यांना अभिनेत्री बनायचे नव्हते
टीना यांनी 1975 मध्ये इंटरनॅशनल टीन प्रिंसेंस कॉन्टेस्ट, अरूबा (स्पेन)मध्ये भारतातर्फे सहभाग घेतला होता. येथे त्यांना मिस फोटोजेनिक आणि मिस बिकिनीचा पुरस्कार मिळाला. या शोमध्येच देव आनंद यांनी टीना यांना पहिल्यांदा पाहिले होते आणि त्यांना आपला चित्रपट ‘देस-परदेस’साठी साइन केले. खरेतर टीना या चित्रपटासाठी नकार देत होत्या. कारण त्यांना फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करण्यासाठी पॅरिसला जाण्याची इच्छा होती. पण खूप आग्रह केल्यानंतर चित्रपटासाठी होकार दिला.
गुजराती जैन कुटुंबात जन्मलेल्या टीना यांचे खरे नाव निव्रुति मुनीम आहे. टीना त्यांचा 1 भाऊ आणि नऊ बहिणींमध्ये सर्वात लहान आहेत. टीना यांची मोठी बहीण भावना मॉडेलिंगमध्ये होती, म्हणून टीना यांनाही मॉडेल बनण्याची इच्छा होती.
अशी झाली होती लव्ह लाइफची सुरुवात
1986 मध्ये टीना मुनीम यांची बिझनेस टायकून अनिल अंबानी यांच्यासोबत पहिल्यांदा भेट झाली होती. त्यांच्या प्रेम कथेला अनेक वळण मिळाले. रिपोर्ट्सनुसार, अनिल यांनी टीना यांना पहिल्यांदा विवाह सोहळ्यात पाहिले होते. टीना ब्लॅक ड्रेसमध्ये आल्या होत्या, जो अनिल यांना खूप पसंत पडला. ही भेट टीना यांचा भाच्याच्या माध्यमातून झाली होती. त्या काळात टीना बॉलिवूडच्या मोठ्या स्टार होत्या.
टीना यांनी अनिल यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीदरम्यान रिलायन्सविषयी काहीही ऐललेले नव्हते. पण टीना यांनी म्हटले की, पहिल्या भेटीत अनिल त्यांना खूप आवडले होते.
फॅमिली प्रेशरमुळे घेतला होता दूर होण्याचा निर्णय
अनिल यांनी टीनाविषयी आपल्या कुटुंबियांना सांगितले तेव्हा ते या विरोधात होते. एक अभिनेत्री त्यांची सून बनावी असे त्यांना वाटत नव्हते. फॅमिली प्रेशरमुळे अनिल यांनी टीनापासून दूर होण्याचा निर्णय घेतला. रिपोर्ट्सनुसार जेव्हा त्यांना हा निर्णय टीना यांना सांगितला, तेव्हा त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. मात्र यामुळे टीना यांना मोठा धक्का बसला होता.
भूकंपानंतर पुन्हा सुरू झाली बातचित
मात्र या प्रेम कहानीचा क्लायमॅक्स हा नव्हता. भेटणे, वेगळे होणे आणि वेगळे होऊन पुन्हा भेटणे. 1989 मध्ये अमेरिकेच्या लॉस एंजिल्समध्ये मोठा भूकंप झाला होता. त्या वेळी टीना तिथेच होत्या. अनिल यांनी कुठूनतरी नंबर शोधून टीना यांना फोन केला. फोनवर अनिल यांनी टीना यांना केवळ विचारले की, तु बरी आहेस ना? टीना यांचे उत्तर मिळाल्यानंतर न बोलताच अनिल यांनी फोन कट केला. अनिल यांच्या अशा वागण्याने टीना चकीत झाल्या. टीना यांनाही राहावले नाही आणि दोघांमध्ये पुन्हा बोलणे सुरू झाले.
1991 मध्ये झाले होते लग्न
टीना आणि अनिल यांच्यात झालेल्या भेटींमध्ये दोघे हे नेहमीच लोकल भाषा गुजरातीमध्येच बोलायचे. नंतर कुटुंबाच्या सहमतीनंतर 1991 मध्ये अनिल आणि टीना यांचे लग्न झाले. टीना आपले पती अनिल अंबानी यांच्यापेक्षा दोन वर्षे मोठ्या आहेत. टीना यांचा जन्म 1957 मध्ये झाला होता. तर अनिल यांचा जन्म 1959 मध्ये झाला होता. टीना यांना अनमोल आणि अंशुल नावाची दोन मुलं आहेत.
असे बोलले जाते की, 2008 मध्ये टीना यांच्या वाढदिवशी अनिल यांनी त्यांच्यासाठी लग्जरी याट खरेदी केली होती. जिचे नाव टियान (Tian) होते. हे नाव अनिल आणि टीना यांच्या नावाचे पहिले अक्षर मिळून बनले होते. टीना सीनियर सिटीझनसाठी मुंबईमध्ये हार्मोनी फाउंडेशन चालवतात.
अशाप्रकारे न्यू आर्टिस्ट्स यांना प्रमोट करण्यासाठी हार्मोनी आर्ट फाउंडेशन त्या चालवतात. टीना यांना शॉपिंगसाठी अमेरिकेत जाणे आवडत नाही. त्यांच्यानुसार त्या खूप खर्च करतात आणि त्यांना आवडले तर ते संपूर्ण मार्केटही खरेदी करु शकतात. यामुळे त्या अशा ठिकाणांवर जाणे टाळतात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.