आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत प्रकरणात ईडीची चौकशी:रियाच्या खारस्थित फ्लॅटवर झालेल्या धाडीत मिळाले अनेक पुरावे, आज सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठानीची ईडीकडून चौकशी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुक्रवारी ईडीने रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीची दोन तास तर रियाची जवळजवळ साडेआठ तास चौकशी केली.
  • ईडीच्या चौकशीत खारस्थित फ्लॅट रियाने 84 लाखांत खरेदी केल्याचे समोर आले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ईडी मनी लाँडरिंगच्या कोनातून तपास करत आहे. शुक्रवारी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिची या प्रकरणी जवळजवळ साडे आठ तास चौकशी करण्यात आली. रियासह तिचा भाऊ शोविक, सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी आणि सीए रितेश शाह यांचीही ईडीने चौकशी केली होती. आज (शनिवार) सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठानी याला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. सुशांतच्या वडिलांनी रिया आणि तिच्या कुटुंबीयांवर सुशांतचे पैसे हडपल्याचा आरोप केला आहे.

  • मुंबई पोलिसांकडून तीनदा चौकशी करण्यात आली आहे

या लोकांचे जबाब प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अ‍ॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत नोंदविण्यात येत आहेत. सुशांतचे सोशल मीडिया अकाउंट हाताळणारा सिद्धार्थ पिठानी सुशांतबरोबर एक वर्षापासून राहत होता. त्यानेच सर्वप्रथम सुशांतचा मृतदेह पाहिला होता. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या अॅक्सिडेंटल डेथ रिपोर्ट (ADR) मध्ये सिद्धार्थने तीनदा आपला जबाब नोंदवला आहे.

  • ईडीच्या टीमने रियाच्या फ्लॅटवर छापा टाकला

शुक्रवारी ईडीची एक टीम रियाच्या मुंबईतील खार स्थित संपत्तीची चौकशी करण्यासाठी तिच्या फ्लॅटवर पोहोचले होते. येथे रियाचा वन बीएचके फ्लॅट आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जीएसटीसह या फ्लॅटची किंमत सुमारे 84 लाख रुपये आहे. या घरासाठी रियाने 25 लाखांचे डाऊन पेमेंट केले होते. तर 60 लाखांचे होम लोन घेतले होते. हा फ्लॅट 550 स्क्वेअर फिटचा आहे. रियाने 2018 मध्ये हा फ्लॅट घेतला असल्याचे समजते. या धाडीत ईडीच्या पथकाला काही महत्त्वाची कागदपत्रे मिळाली आहेत. यावेळी त्यांनी शेजार्‍यांशी बातचित केली.

  • रियाची 9 तास तर भावाची दोन तास झाली चौकशी

ईडीने सुशांतचे सीए संदीप श्रीधर आणि त्याचा हाऊस किपर सॅम्युएल मिरांडाची दोनदा चौकशी केली आहे. याशिवाय शुक्रवारी रियाची 9 तास आणि तिच्या भावाची दोन तास चौकशी झाली. सुशांतच्या खात्यातून 15 कोटींची रक्कम काढल्याची माहिती खोटी असल्याचे रियाने ईडीला सांगितले आहे. मीही सात चित्रपट केले असून त्यातून पैसे कमावले, असे रियाने तपास यंत्रणेला सांगितले.

  • सीबीआयची पाटणा एसआयटी टीमसोबत मिटींग झाली

सीबीआयने शुक्रवारी पाटणा एसआयटीच्या एका सदस्यासोबत प्रदीर्घ बैठक घेतली. एसआयटीने एकत्रित केलेल्या सर्व तथ्ये आणि पुराव्यांचा त्यांनी यावेळी अभ्यास केला.

बातम्या आणखी आहेत...