आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • | Today Riya Was Summoned For The Second Time And Her Brother Was Summoned For The Third Time For Questioning, Father And Manager Were Also Called

सुशांत प्रकरणात ईडीची चौकशी:रिया आणि तिच्या कुटुंबाची ईडीकडून 10 तास चौकशी, रियाची सर्वोच्च न्यायालयात याचिका - मीडियात मला सुशांतच्या मृत्यूसाठी दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय

मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • शनिवारी रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकला ईडीने दुस-यांदा चौकशीसाठी बोलावले होते. यापूर्वी शुक्रवारी दोन तास त्याची चौकशी झाली होती.
 • सुशांत सिंह राजपूतच्या बँक खात्यातून 15 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीने 31 जुलै रोजी रियासह 6 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आर्थिक बाबींचा तपास करणारी ईडीची टीमने चार दिवसांत सोमवारी दुस-यांदा रिया चक्रवर्तीची चौकशी केली. तब्बल दहा तास ही चौकशी सुरु होती. रिया, तिचा भाऊ आणि वडिलांना समोरासमोर बसून ईडीने प्रश्नोत्तरे केली. सोबतच सुशांतचा रुममेट सिद्धार्थ पिठानीसुद्धा सोमवारी ईडीच्या कार्यालयात हजर झाला होता. दुसरीकडे रियाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली गेली आहे. त्यावर 11 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. यात म्हटले गेले की, सुशांत प्रकरणात मीडिया ट्रायल सुरु आहे. सोबतच सुशांतच्या मृत्यूसाठी रियाला दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय, असेही म्हटले गेले आहे.

 • वडिलांना प्रश्न - मुलीला कधी आणि किती आर्थिक मदत केली

यापूर्वी 7 ऑगस्ट रोडी रियाची ईडीकडून चौकशी झाली होती. वडिलांकडून आपल्याला आर्थिक पाठिंबा मिळत असल्याचे रियाने या चौकशीत सांगितले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीचे अधिका-यांनी रियाच्या वडिलांना तिला कधी आणि किती आर्थिक सहाय्य केले, याविषयी विचारणा केली. जर पैसे दिले, तर मग तुमच्या उत्पन्नाचे माध्यम काय आहे, असा प्रश्नही त्यांनी रियाचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांना केला आहे.

रिया सोमवारी सकाळी 11 वाजता भाऊ शोविक आणि वडील इंद्रजित यांच्यासह ईडी कार्यालयात पोहोचली होती. ईडीकडून रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीची तिस-यांदा, वडील इंद्रजित चक्रवर्ती यांची पहिल्यांदा आणि सुशांतची बिझनेस मॅनेजर श्रुती मोदीची दुस-यांदा चौकशी झाली.

सुशांतची माजी बिजनेस मॅनेजर श्रुती मोदी सोमवार काही डॉक्यूमेंट्स घेऊन ईडी ऑफिसमध्ये पोहोचली.
सुशांतची माजी बिजनेस मॅनेजर श्रुती मोदी सोमवार काही डॉक्यूमेंट्स घेऊन ईडी ऑफिसमध्ये पोहोचली.
 • पहिल्या चौकशीत रियाने सहकार्य केले नव्हते

सुशांत सिंह राजपूतच्या बँक खात्यातून 15 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीने 31 जुलै रोजी रियासह 6 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. सुरुवातीला रियाने तपासात सहकार्य केले नाही. कधी ती आजारपणाचे कारण सांगत होती, तर एका प्रश्नाच्या उत्तरात आता काहीच आठवत नाही, असे ती म्हणाली होती. सुशांतच्या खात्यातून पैसे काढल्याचा आरोप खोटा असल्याचे तिने म्हटले आहे. रियाच्या म्हणण्यानुसार, तिने 7 चित्रपट केले आणि त्यातून तिने पैसे कमावले आहेत. आज सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठानी यालादेखील चौकशीसाठी समन बजावण्यात आले आहे. सिद्धार्थ सध्या हैदराबादमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे.

शनिवारी ईडीने शोविकची 18 तास चौकशी केली

 • ईडी रियाच्या ज्या तीन प्रॉपर्टीची चौकशी करीत आहेत, त्यापैकी एक खार भागात, दुसरी जुहू आणि तिसरी नवी मुंबईत आहे. या तीन मालमत्तेचे बाजार मूल्य एकत्रितपणे 3 कोटी रुपये आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रियाने 2018 नंतर या तीन मालमत्ता खरेदी केल्या.
 • या तीनपैकी एका मालमत्तेबद्दल रियाने ईडीला स्पष्टपणे सांगितले. खार भागात तिचा एक बीएचके फ्लॅट आहे. 322 चौरस फूट फ्लॅटची किंमत आजच्या भावानुसार सुमारे एक कोटी रुपये आहे. रियाने हा फ्लॅट 2018 मध्ये 76 लाख रुपयांमध्ये खरेदी केला होता. हा फ्लॅट तिने 51 हजार रुपयांत बुक केला होता, तर मे 2018 मध्ये त्याचे रजिस्ट्रेशन केले होते.

रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीची 8 ऑगस्ट रोजी (शनिवारी) सुमारे 18 तास चौकशी केली गेली होती. आदल्या दिवशी म्हणजे 7 ऑगस्ट रोजी (शुक्रवारी) त्याची फक्त दोन तास चौकशी करण्यात आली होती. यानंतर, तो पुन्हा शनिवारी दुपारी ईडी कार्यालयात पोहोचला आणि रविवारी सकाळी 6.30 च्या सुमारास बल्लार्ड इस्टेट परिसरातील ईडी कार्यालयातून बाहेर पडला होता. त्यानंतर आज तिस-यांदा तो ईडीच्या कार्यालयात पोहोचला आहे.

 • सुशांतच्या कंपनीतील सर्व व्यवहार शोविकच बघायचा

ईडीच्या सूत्रांच्या माहितीनुसार, शोविक सुशांतसोबत एक सक्रिय पार्टनर होता. सुशांतच्या कंपन्या, उत्पन्न, गुंतवणूक आणि रिया-सुशांत यांच्याशी झालेल्या आर्थिक व्यवहारांबद्दल शोविकला प्रश्न विचारण्यात आले. त्याचा जबाब प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अ‍ॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत नोंदविण्यात आला आहे. रियाचे चार्टर्ड अकाउंटंट रितेश शहा यांचीही चौकशी केली गेली आहे.

 • ईडीने मागितला मागील 5 वर्षांचा इनकम टॅक्सचा रेकॉर्ड

ईडीच्या सूत्रांच्या माहितीनुसार, 7 ऑगस्ट रोजी झालेल्या चौकशीदरम्यान रियाने ईडाला सहकार्य केले नाही. त्यामुळे तिची जवळजवळ साडे आठ तास चौकशी केली गेली. ईडीने सर्वांना(रिया, शोविक, वडील इंद्रजित) आपल्या संपत्तीची कागदपत्रे आणायला सांगितली होती. आजची चौकशी रियाचे उत्पन्न, गुंतवणूक, व्यवसाय आणि व्यावसायिक करारांविषयी असेल. ईडी रियाची खार आणि नवी मुंबईतील मालमत्तेविषयी चौकशी करत असून तिला तिच्या मागील पाच वर्षांचा इनकम टॅक्स रेकॉर्ड दाखवण्यास सांगितले आहे.

 • सुशांतच्या कुटुंबीयांवर रियाचे गंभीर आरोप

ईडीच्या चौकशीत रियाने सुशांतच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले. तिचा दावा आहे की, सुशांतचे कुटुंबीय त्याचा विमा व इतर मालमत्ता मिळवण्यासाठी त्याच्यावर दबाव आणत होते. इतकेच नाही तर त्याचे कुटुंबीय दोघांना वेगळे करण्यासाठी प्रय़त्नशील होते. यासाठी सुशांतचे आयपीएस भावोजी कित्येक महिन्यांपासून एक मोठा कट रचत होते, असे रियाने या चौकशीत सांगितल्याचे सूत्रांकडून समजते. सुशांतने माझ्यावर जो खर्च केला तो स्वत:च्या मर्जीने काल असेही ती म्हणाली होती.

 • रियावर आरोप - पूजेच्या नावाखाली सुशांतच्या खात्यातून लाखो रुपये काढले

सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी 25 जुलै रोजी रियाविरोधात पाटण्यात एफआयआर दाखल केला होता, जो सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. रिया आणि तिच्या कुटुंबीयांवर सुशांतची फसवणूक केल्याचा आणि त्याच्या खात्यातून 15 कोटींचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.

सुशांतच्या बँक खात्यातून रियाने पाच वेळा पूजापाठ आणि पुरोहितांना देण्यासाठी लाखो रुपये काढले होते. सुशांतची बहीण मितूने आरोप केला की, रियाने तिच्या भावाविरूद्ध तंत्र-मंत्र करण्यासाठी हा पैसा वापरला होता.

बातम्या आणखी आहेत...