आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालिबानवरही बोलली कंगना:जीव वाचवण्यासाठी विमानाला लटकलेले 3 जण कोसळून ठार, कंगना म्हणाली - ‘जब जीना मौत से बत्तर हो…’

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बॉलिवूड कलाकारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अफगाणिस्तान अखेर तालिबानच्या हाती सापडला. रविवारी तालिबानी अतिरेकी राजधानी काबूलमध्ये घुसण्याआधीच राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी कुटुंबासोबत देश सोडून पळून गेले. काबूलवर तालिबानच्या ताब्यानंतर ३ हजारांपेक्षा जास्त लोक रात्रीच विमानतळात घुसले. लोक टेकऑफ करणाऱ्या विमानांमागे आणि पुढे धावू लागले. जणू एखाद्या बसमध्ये गर्दी होते तसे चित्र येथे दिसले. यावेळी तीन अफगाणी लोक विमानाच्या चाकांमध्ये लपून बसले होते. टेकऑफनंतर ते थेट जमिनीवर कोसळले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. काबूल विमानतळावरील हा व्हिडिओ बघून सगळेच हळहळले. बॉलिवूड कलाकारांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्री कंगना रनोट हिने अफगाणिस्तानची सद्यस्थिती पाहून सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने विमानतळावरील हा व्हिडिओ शेअर करत जीना मौत से बत्तर हो..., असे म्हटले आहे.

आज आपण शांत राहिलो तर उद्या आपल्यावर ही वेळ येईल - कंगना
पुढे कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर करत लिहिले, 'आज आपण सर्वजण हे शांतपणे बघत बसलो आहोत. पण हे कदाचित उद्या आपल्यासोबतही घडू शकते.'

पुढे तिने लिहिले, 'तुम्हाला माहिती आहे का अफगाणिस्तानदेखील एक हिंदू आणि बौद्ध राष्ट्र होते. ते मुस्लिम राष्ट्र कसे झाले?' यासोबत ती म्हणाली, लक्षात ठेवा पाकिस्तान अमेरिकेचे गोडवे गातो आणि अमेरिका त्यांना हत्यारे पुरवतो. तालिबानी आपल्या किती जवळ आले आहे ते बघा. हे उद्या आपल्यासोबतही घडू शकते परंतु आपल्यासोबत मोदीजी आहेत. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही.'

अखेरपर्यंत लढू, असे राष्ट्राध्यक्ष गनी 2 दिवसांपूर्वी म्हणाले होते. पळाल्यानंतर म्हणाले, रक्तपात थांबवण्यासाठी देश सोडला. ते आता अमेरिकेला जाणार आहेत. सोमवारी ते ताजिकिस्तानात होते. ओमानमध्ये त्यांना लँडिंगची परवानगी दिली नाही.

बातम्या आणखी आहेत...