आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगना रनोटच्या भावाचे लग्न:आज हळद आणि संगीत समारंभ होणार, उद्या रितूसह बोहल्यावर चढणार अक्षत रनोट

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजस्थानी थीमवर होणार आहे अक्षतचे लग्न

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोटचा भाऊ अक्षतचे डेस्टिनेशन वेडिंग लेकसिटी उदयपूर येथे होणार आहे. दोन दिवस चालणा-या या लग्न समारंभात बुधवारी दुपारी हळद आणि संध्याकाळी संगीत सेरेमनीचे आयोजन करण्यात आले आहे. तर गुरुवारी सकाळी 9: 15 वाजताच्या मुहूर्तावर अक्षत रनोट आणि रितू सागवान लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. लग्नानंतर संध्याकाळी रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये दोन्ही कुटुंबातील निवडक लोक उपस्थित असतील.

अक्षतसोबत सेल्फी घेताना कंगना आणि कुटुंबीय
अक्षतसोबत सेल्फी घेताना कंगना आणि कुटुंबीय

कंगनाने राजस्थानी पदार्थांचा आनंद लुटला
भाऊ अक्षतच्या लग्नाच्या निमित्ताने कंगना सध्या उदयपूरच्या द लीला पॅलेसमध्ये थांबली आहे. काल रात्री शीश महल रेस्तराँमध्ये कंगनाने कुटुंबीयांसह राजस्थानी पदार्थांची चव चाखली. यावेळी तिच्यासह तिची बहीण रंगोली, भाऊ अक्षत, आई आशा आणि कुटुंबातील अन्य सदस्य होते.

कंगनाने कुटुंबीयांसह शीश महलमध्ये केले डिनर
कंगनाने कुटुंबीयांसह शीश महलमध्ये केले डिनर

राजस्थानी थीमवर होणार आहे अक्षतचे लग्न
अक्षय रनोट आणि रितू सागवान यांचे डेस्टिनेशन वेडिंग उदयपूरात होत असून लग्नस्थळ राजस्थानी थीमने सजवण्यात आले आहे. यावेळी राजस्थानी कलाकार सादरीकरण करणार आहेत. याव्यतिरिक्त विदेशी फुलांनीही विशेष सजावट केली जाईल, ज्याची किंमत अंदाजे 12 लाखाहून अधिक आहे.

अक्षत आणि रितूच्या लग्नाची तयारी
अक्षत आणि रितूच्या लग्नाची तयारी
बातम्या आणखी आहेत...