आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता साई धरम तेज अपघातात गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी रात्री साई त्याच्या स्पोर्ट्स बाइकवरुन हैदराबादच्या दुर्गमचेरुवु केबल पुलावरून जात असताना हा अपघात झाला आहे. रस्त्यावर चिखल असल्याने त्याची बाईक घसरली आणि हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे. सध्या तो बेशुद्ध असल्याची माहिती आहे. रिपोर्टनुसार, तो सध्या व्हेंटिलेटरवर आहे.
अपघातानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साई धरम तेज याच्या टीमकडून दिलेल्या माहितीनुसार, ' साई धरम तेजची तब्येत स्थिर आहे. चिंता करण्याचे कोणतंही कारण नाही. रुग्णालयात त्याची काळजी घेतली जात आहे.' साईला अपघात झाल्याचे वृत्त समोर येताच अभिनेता पवन कल्याण, चिरंजीवी आणि कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली.
अपघातानंतर सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्या फोटोंमध्ये साई धरम तेजच्या डोळ्याला आणि कमरेवरती जखमा झाल्याचे पाहायला मिळत आहे.
साई धरम तेज हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. काही महिन्यांपूर्वी त्याने सोशल मीडियावर चाहत्यांशी ‘आस्क मी एनीथिंग’ या सत्रात संवाद साधला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.