आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी:300 हून अधिक चित्रपटांत टॉम अल्टर यांनी केला होता अभिनय, सचिन तेंडुलकरची पहिली मुलाखत घेऊन आले होते चर्चेत

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वातंत्र्यापूर्वी त्यांचे आजी आजोबा अमेरिकेतून भारतात आले होते. त्यानंतर त्यांचे कुटुंब भारतातच स्थायिक झाले होते.

रंगभूमी, टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणारे अभिनेते टॉम अल्टर यांची आज 71 वी बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी आहे. अल्टर यांचा 22 जून 1950 मध्ये मसुरीमध्ये जन्म झाला होता. त्यांचे शालेय शिक्षण वूडस्टॉक स्कूलमध्ये झाले. त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी येल विद्यापीठात गेले. 1970 नंतर ते पुन्हा भारतात आले. पुण्यातील ‘एफटीआयआय’मध्ये त्यांना 1972 मध्ये प्रवेश मिळाला. उत्तर भारतातील 800 जणांमधून केवळ 3 विद्यार्थ्यांना निवडण्यात आले होते, ज्यात अल्टर यांचा समावेश होता. पुढे त्यांनी अभिनयामध्ये डिप्लोमा केला, ज्यात त्यांना सुवर्णपदकाने गौरवण्यात आले.

सुमारे 300 चित्रपटांमध्ये टॉम यांनी अभिनय केला होता. स्वातंत्र्यापूर्वी त्यांचे आजी आजोबा अमेरिकेतून भारतात आले होते. त्यानंतर त्यांचे कुटुंब भारतातच स्थायिक झाले होते. कला आणि चित्रपट विश्वातील अभूतपूर्व योगदानासाठी 2008 मध्ये त्यांचा भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सत्कार करण्यात आला होता. 20 सप्टेंबर 2017 रोजी वयाच्या 67 व्या वर्षी स्किन कॅन्सरमुळे त्यांचे निधन झाले होते.

'आशिकी'च्या एका दृश्यात टॉम ऑल्टर
'आशिकी'च्या एका दृश्यात टॉम ऑल्टर

70 च्या दशकात बॉलिवूडमध्ये पदार्पण
अमेरिकन वंशाच्या अल्टर यांनी 1976 मध्ये ‘चरस’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ‘शतरंज के खिलाडी’, ‘गांधी’, ‘बोस’, ‘वीर झारा’सह तीनशेहून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. ‘दप्तर’ या मराठी चित्रपटातही ते दिसले. अल्टर यांनी काही चित्रपटांचे दिग्दर्शनही केले होते. 90 च्या दशकात दूरदर्शनवरील ‘जबान संभालके’ या शोनंतर अल्टर हे नाव घराघरांत ओळखले जाऊ लागले. ‘जुनून’ मालिकेत त्यांनी साकारलेली गँगस्टर केशव कलसीची भूमिका विशेष गाजली होती. तसेच ‘भारत एक खोज’, ‘शक्तिमान’, ‘मेरे घर आना जिंदगी’, ‘यहाँ के हम सिकंदर’ यांसारख्या मालिकांमधूनही त्यांनी दमदार अभिनयाने छाप पाडली.

हिंदी, इंग्रजी, उर्दू तिन्ही भाषांवर होते प्रभूत्व

त्यांचे हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या भाषांवर प्रभूत्व होते. ऑल्टर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, माझे वडील पादरी होते, मात्र ते बायबल आम्हाला उर्दूत सांगत होते.

टॉम ऑल्टर यांनी 1980-90 च्या दशकात स्पोर्ट्स पत्रकारिता केली होती.
टॉम ऑल्टर यांनी 1980-90 च्या दशकात स्पोर्ट्स पत्रकारिता केली होती.

सचिनचा इंटरव्यू घेणारे पहिले पत्रकार होते टॉम ऑल्टर
खूप कमी जणांना माहीत आहे की, टॉम ऑल्टर यांनी 1980 ते 1990 दरम्यान क्रीडा पत्रकारिता केली होती. भारतासाठी पदार्पण करण्यापूर्वी क्रिकेट स्टार सचिन तेंडुलकरची टीव्हीसाठी मुलाखत घेणारे ते पहिलेच मुलाखतकार होते. त्यावेळी सचिनचे वय 15 वर्षे होते. तसेच अल्टर यांनी तीन पुस्तकांचे लेखनही केले आहे.

बातम्या आणखी आहेत...