आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉम क्रूझने हटके पद्धतीने मानले चाहत्यांचे आभार:हजारो फुटांवरून मारली उडी, चित्रपटाच्या यशाचा साजरा केला आनंद

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता टॉम क्रूझ चित्रपटांमधील त्याच्या थरारक स्टंट्ससाठी ओळखला जातो. केवळ पडद्यावरच नव्हे तर पडद्यामागेही तो धडकी भरणारे धोकादायक स्टंट करताना दिसतो. आता अलीकडेच त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो आकाशातून उडी मारताना दिसतोय. उडी मारताना त्याने चाहत्यांसाठी एक खास मेसेज रेकॉर्ड केला आहे. टॉमचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो. सध्या टॉम त्याच्या 'मिशन इम्पॉसिबल 7'चे चित्रीकरण करत आहे.

टॉममने चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. टॉम क्रूझ त्याच्या टॉप गन - मॅवरिक या चित्रपटाच्या यशामुळे खूप आनंदी आहे आणि म्हणूनच त्याने चाहत्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी असा अनोखा मार्ग निवडला आहे.

विमानातून उडी मारून चाहत्यांचे आभार मानले

टॉम क्रूझने स्वतः विमानातून उडी मारतानाचा व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओमध्ये टॉम एअरक्राफ्टच्या कोपऱ्यावर बसला आहे जे फार उंचावर आहे आणि टॉम त्याच्या मनातील भावना शेअर करत आहे. तो म्हणाला, "सध्या आम्ही दक्षिण आफ्रिकेत ‘मिशन इम्पॉसिबल 7’च्या भाग 1 आणि 2 च्या चित्रीकरणात व्यस्त आहोत. यावर्षाचा शेवट तुम्हा सगळ्यांचे आभार मानल्याशिवाय नसता झाला. त्यामुळे ‘टॉप गन : मॅवरिक’ला तुम्ही जे प्रेम आणि पाठिंबा दिलात त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानतो," असे टॉम म्हणाला आहे.

यानंतर टॉमने उडी मारायची तयारी केली आणि त्यानंतरही तो कॅमेराच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत होता. त्याने पुन्हा त्याच्या चाहत्यांचे मनापासून आभार मानले. चाहत्यांनी त्याच्या या धाडसाचे प्रचंड कौतुक केले आहे. "वय म्हणजे या माणसासाठी केवळ एक आकडा आहे." असं काही चाहत्यांनी या व्हिडिओखाली कॉमेंट करत म्हटले आहे.

चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे भारावला टॉम क्रूझ
टॉम क्रूझच्या नुकत्यात रिलीज झालेल्या 'टॉप गन - मॅवरिक' या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 4,973 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पॅरामाउंट पिक्चर्सच्या बॅनरखाली बनलेला हा चित्रपट 1986 च्या टॉप गनचा अधिकृत रिमेक होता. हा पॅरामाउंट पिक्चर्सचा देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

यापूर्वी हा विक्रम 'टायटॅनिक' या चित्रपटाच्या नावावर होता. हा चित्रपट टॉम क्रूझच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 2022 मध्ये बनलेल्या सर्व हॉलिवूड चित्रपटांपैकी 'टॉप गन - मॅवरिक'ने सर्वाधिक कमाई केली आहे.

हा चित्रपट 26 डिसेंबरपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे
'टॉप गन - मॅवरिक' हा चित्रपट 27 मे 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर देखील दाखल होणार असल्याची माहिती प्राइम व्हिडिओने दिली आहे. हा चित्रपट 26 डिसेंबरपासून ओटीटीवर स्ट्रीम होणार आहे.

हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. टॉम क्रूझ सध्या 'मिशन इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट वन'चे शूटिंग करत आहे. हा चित्रपट 14 जुलै 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय त्याचा दुसरा भाग 28 जून 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...