आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एसपींची 10 एव्हरग्रीन हिंदी गाणी:लोकांना वाटायचे सलमानवर फिट बसणार नाही बालासुब्रह्मण्यम यांचा आवाज, मात्र 90 च्या दशकात यांनीच गायलेल्या गाण्यांमुळे लोकप्रिय झाला सलमान

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बालासुब्रह्मण्यम हिंदीत अभिनेता सलमान खानचा आवाज म्हणून ओळखले जायचे.

प्रसिद्ध पार्श्वगायक एस.पी. बालासुब्रमण्यम यांचे शुक्रवारी वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले आहे. कोरोनाव्हायरसच्या संसर्गामुळे ते जवळपास दीड महिना रुग्णालयात दाखल होते. मात्र अखेर आज त्यांची कोरोनाशी झुंज संपली. आपल्या 50 वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी सहा भाषांमध्ये 40,000 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. हिंदीत ते अभिनेता सलमान खानचा आवाज म्हणून ओळखले जायचे. 90 च्या दशकात त्यांनी सलमानच्या अनेक चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले होते. एक नजर टाकुयात त्यांनी हिंदीत गायलेल्या काही निवडक गाण्यांवर...

1) गाणे: दिल दीवाना,

बिन सजना के माने न,

ये पगला है,

समझाने से समझे ना...

चित्रपट : मैंने प्यार किया(1989)

मैंने प्यार किया हा अभिनेता म्हणून सलमान खानच्या कारकिर्दीतील पहिला चित्रपट होता आणि तो ब्लॉकबस्टर ठरला होता. जेव्हा बालासुब्रमण्यम यांची निवड सलमानच्या गाण्यांसाठी केली गेली, तेव्हा त्यांचा आवाज सलमानवर फिट बसणार नाही, असे लोकांचे मत होते. परंतु हे चुकीचे असल्याचे सिद्ध झाले. नव्वदच्या दशकात, बाला यांनीच सलमानची सर्वाधिक हिट गाणी गायली होती, ज्यामुळे सलमान देखील टॉपवर पोहोचला होता. या गाण्यांसाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट मेल प्लेबॅक सिंगरचा पुरस्कार मिळाला होता.

2) गाणे: मेरे रंग में,

रंगने वाली,

परी हो या परियों की रानी

या हो मेरी प्रेम कहानी...

चित्रपट : मैंने प्यार किया(1989)

सलमान खान आणि भाग्यश्रीवर चित्रित झालेले हे गाणेही सुपरहिट ठरले होते. या गाण्याचे बोल देव कोहली यांनी लिहिले होते.

3) गाणे : पहला पहला प्यार है,

पहली पहली बार है,

जान के भी अंजाना,

ऐसा मेरा प्यार है...

चित्रपट : हम आपके हैं कौन(1994)

लता मंगेशकर यांच्यासोबत गायलेले हे रोमँटिक गाणे एसपींच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक आहे. हे गाणे माधुरी दीक्षित आणि सलमान खानवर चित्रित करण्यात आले होते. याचे बोल देव कोहली यांनी लिहिले होते आणि संगीत राम लक्ष्मण यांनी दिले होते.

4) गाणे: हम आपके हैं कौन

बेचैन है, मेरी नजर

है प्यार का कैसा असर

न चुप रहो, इतना कहो

हम आप के, आप के हैं कौन...

चित्रपट : हम आपके हैं कौन (1994)

चित्रपटाची सुरूवात टायटल ट्रॅकने होते, हे गाणे प्रचंड हिट ठरले होते. या चित्रपटाचे संगीतकार राम लक्ष्मण हे होते. तर एस. पी. बालासुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांनी गाण्याला आवाज दिला होता.

5) गाणे: दीदी तेरा देवर दीवाना

हाय राम कुड़ियों को डाले दाना

हाय राम कुड़ियों को डाले दाना

धंधा है ये उसका पुराना

चित्रपट : हम आपके हैं कौन (1994)

एस.पी. बालासुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील या गाण्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. माधुरी दीक्षित आणि सलमान खानच्या उत्कृष्ट केमिस्ट्रीमुळे हे गाणे अधिक खास झाले होते.

6) गाणे: कभी तू छलिया लगता है,

कभी दीवाना लगता है

कभी अनाड़ी लगता है

कभी आवारा लगता है...

चित्रपट : पत्थर के फूल (1991)

सलमान खान आणि रवीना टंडन यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले होते. याचे संगीत राम लक्ष्मण यांनी दिले होते. एस.पी. बालासुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांनी हे गाणे स्वरबद्ध केले होते.

7) गाणे : तुमसे जो देखते ही प्यार हुआ

जिंदगी में पहली बार हुआ

तुम इतने दिन थी कहां

मैं ढूंढता ही रहा

कहां?

चित्रपट : पत्थर के फूल (1991)

हे गाणे सलमान खान आणि रवीना टंडन यांच्यावर चित्रीत करण्यात आले होते. या गाण्याला एसपी बालासुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांनी आवाज दिला होता. राम लक्ष्मण यांनी संगीत दिले होते.

8) गाणे: साथिया तूने क्या किया

बेलिया ये तूने क्या किया

मैंने किया तेरा इंतजार

इतना करो ना मुझे प्यार

इतना करो ना मुझे प्यार

चित्रपट : लव (1991)

लव चित्रपटातील हे गाणे सलमान खान आणि रेवतीवर चित्रीत करण्यात आले होते. या गाण्याला एसपी बालासुब्रमण्यम आणि चित्रा यांनी आवाज दिला होता. आनंद-मिलिंद यांनी संगीत दिले होते.

9) गाणे : देखा है पहली बार

साजन की आंखों में प्यार

अब जाके आया मेरे,

बैचेन दिल को करार

चित्रपट : साजन (1991)

हे गाणे माधुरी दीक्षित आणि सलमान खान यांच्यावर चित्रीत करण्यात आले होते, जे एसपी आणि अलका याग्निक यांनी गायले होते. हे गाणे नव्वदच्या दशकातील सर्वोत्कृष्ट रोमँटिक नंबर्सपैकी एख होते.

10) गाणे: रोजा जानेमन

तू ही मेरा दिल

तुझ बिन तरसे नैना

दिल से ना जाती है यादें तुम्हारी

कैसे तुम बिन जीना

चित्रपट : रोजा (1992)

शीर्षक गीत बाला यांनी गायले होते. या चित्रपटाद्वारे त्यांनी ए. आर. रहमानबरोबर पहिल्यांदाच काम केले होते. बाला यांनी या चित्रपटाच्या तामिळ, तेलुगू व्हर्जनमधीलदेखील अनेक गाणी गायली.

बातम्या आणखी आहेत...